JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Dengue Fever: डेंग्यूचा ताप कसा ओळखायचा? 3 प्रकारचा असतो आजार

Dengue Fever: डेंग्यूचा ताप कसा ओळखायचा? 3 प्रकारचा असतो आजार

Dengue Fever : मादी एडिस डास चावल्यानंतर सुमारे 5 दिवसांत डेंग्यू तापाची लक्षणे दिसून येतात. यासोबतच हा आजार शरीरात होण्याचा कालावधी 3 दिवसांपासून ते 10 दिवसांचा असू शकतो. डेंग्यूचे डास दिवसाच चावतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : अलीकडच्या काळात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेत. देशाची राजधानी दिल्लीपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह आणि इतर राज्यांमध्ये डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आलेत. डेंग्यू हा आजार डास चावल्यानं पसरतो. पावसानंतर साचलेले अस्वच्छ पाणी, घरातील कुलर आणि इतर अशा ठिकाणी डेंग्यूच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. जेव्हा मादी एडिस डास चावतो तेव्हा डेंग्यूचा विषाणू आपल्या शरीरात रक्तात शिरतो आणि आपल्या शरीरावर परिणाम करू लागतो. मादी एडिस डास चावल्यानंतर सुमारे 5 दिवसांत डेंग्यू तापाची लक्षणे दिसून येतात. यासोबतच हा आजार शरीरात होण्याचा कालावधी 3 दिवसांपासून ते 10 दिवसांचा असू शकतो. डेंग्यूचे डास दिवसाच चावतात. हे डेंग्यू तापाचे प्रकार आहेत 1. क्लासिकल डेंग्यू फिव्हर (CDF - Classical Dengue Fever) – साधा डेंग्यू ताप रुग्णाला 5 ते 7 दिवस टिकू शकतो. यानंतर रुग्ण केवळ औषधांनी बरा होतो. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, साध्या डेंग्यू तापाचे बहुतांशी रुग्ण आढळतात. या तापाची लक्षणे अशीः - थंडी वाजून ताप येणे. - सांधे, स्नायू दुखणे, डोकेदुखी. - खूप अशक्तपणा वाटणे, भूक न लागणे, मळमळ होणे. - डोळ्यांच्या मागच्या भागात वेदना. - घशात किंचित वेदना जाणवणे. - शरीराच्या काही भागांवर पुरळ उठणे. 2. डेंग्यू हेमोरेजिक फीवर (DHF - Dengue Hemorrhagic Fever) - डेंग्यू तापाचा एक प्रकार म्हणजे ताप येण्यासह शरीराच्या काही भागात रक्तस्राव होणं. यामध्ये साध्या डेंग्यू तापाच्या लक्षणांसोबत इतरही काही लक्षणं दिसतात. रक्त तपासणी करून हा ताप ओळखता येतो. खालील लक्षणं दिसल्यास या प्रकारचा डेंग्यूचा ताप असू शकतो. - शौचास किंवा उलट्यांमध्ये रक्त येणे. - नाक आणि हिरड्यांमधून रक्त येणे. - त्वचेवर गडद निळे काळे डाग. 3. डेंग्यू शॉक सिंड्रोम (DSS - Dengue Shock Syndrome) – डेंग्यू शॉक सिंड्रोम तापामध्ये डेंग्यू हेमोरेजिक तापाच्या लक्षणांव्यतिरिक्त, ‘शॉक’ सारखी स्थिती किंवा काही लक्षणं दिसतात. अशी लक्षणं दिसल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधावा. डेंग्यूच्या या तीन लक्षणांपैकी DHF आणि DSS ही लक्षणे अधिक धोकादायक आहेत. खालील लक्षणे दिसल्यास तो ताप डेंग्यू शॉक सिंड्रोम असू शकतो. हे वाचा -  केवळ 11 हजारात घरी आणा सर्वाधिक मायलेज देणारी कार; Maruti Celerio खरेदीची सुवर्ण संधी - खूप ताप आला असला तरी त्वचा थंडच असणं. - रुग्णाची सतत अस्वस्थता. - रुग्ण हळूहळू बेशुद्ध होतो. डेंग्यू ओळखण्यासाठी या चाचण्या केल्या जातात 1. NS1 – जर रुग्णामध्ये डेंग्यूची लक्षणं दिसली तर ही चाचणी ५ दिवसांच्या आत करणं योग्य मानलं जातं. जर ही चाचणी पाच दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर केली गेली तर, त्याचा निकालही चुकीचा येऊ शकतो. हे वाचा -  Netflix कडून 5 नव्या गेम्सची घोषणा, वेगळ्या सब्सक्रिप्शनची गरज? जाणून घ्या प्रोसेस 2. एलिसा चाचणी - डेंग्यूची ही चाचणी अधिक विश्वासार्ह मानली जाते. साधारणपणे या चाचणीत डेंग्यू आहे किंवा नाही हे जवळपास शंभर टक्के बरोबर समजते. दोन प्रकारच्या ELISA चाचण्या आहेत ज्यांना IgM आणि IgG म्हणतात. डेंग्यूची लक्षणे दिसू लागल्यावर 3 ते 5 दिवसांत IgM चाचणी करणं योग्य ठरतं, तर IgG 5 ते 10 दिवसांत करणे अधिक योग्य मानलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या