JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हीही झोपेसाठी कफ सिरपचा वापर करताय का? दीर्घकालीन घातक परिणामांना तोंड द्यावं लागेल

तुम्हीही झोपेसाठी कफ सिरपचा वापर करताय का? दीर्घकालीन घातक परिणामांना तोंड द्यावं लागेल

Cough Syrups uses for sleep side effects: कफ सिरप (Cough Syrups) घेतल्यानंतर सहसा थोडीशी झोप येऊ शकते. पण ते जास्त प्रमाणात घेतल्यास जास्त झोप येऊ शकते. मात्र, हे माहिती असलेले आणि ज्यांना रात्री झोप येत नाही असे काही लोक रात्री जास्त प्रमाणात कफ सिरपचं सेवन करू लागतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जानेवारी : आपल्यापैकी बहुतेकजण खोकला झाल्यानंतर बेनाड्रील कफ सिरप, चेस्टन कफ सिरप, हनीटस कफ सिरप, अ‌ॅस्कोरिल कफ सिरपचं (Benadryl Cough Syrup, Cheston Cough Syrup, Honitus Cough Syrup, Ascoril Cough Syrup) सेवन करतात. जेव्हा छातीत श्लेष्मा किंवा खोकला जमा होतो तेव्हा कफ सिरप घेतल्यानंतर बरे वाटते. कफ सिरप (Cough Syrups) घेतल्यानंतर सहसा थोडीशी झोप येऊ शकते. पण ते जास्त प्रमाणात घेतल्यास जास्त झोप येऊ शकते. मात्र, हे माहिती असलेले आणि ज्यांना रात्री झोप येत नाही असे काही लोक रात्री जास्त प्रमाणात कफ सिरपचं सेवन करू लागतात. पण खोकला नसतानाही कायमस्वरूपी कफ सिरप घेतल्यानं अनेक घातक दुष्परिणाम होऊ शकतात. कफ सिरपमध्ये असे अनेक पदार्थ वापरले जातात, ज्यामुळं मेंदूला गंभीर नुकसान होऊ शकतं. कफ सिरप कशापासून बनवलं जातं सुरुवातीला अफू, हेरॉईन, क्लोरोफॉर्म आणि मॉर्फिन यांसारखे पदार्थ कफ सिरपमध्ये वापरले जात होते. नंतर त्यांच्यावर बंदी आणल्यानंतर आणि ते नियंत्रित केले गेल्यानंतर संश्लेषण किंवा सिंथेसिस केलेले पदार्थ यात वापरले जाऊ लागले. आज, अनेक उत्तम संशोधनावर आधारित अनेक घटक कफ सिरपमध्ये वापरले जातात, जे संश्लेषित करून बनवले जातात. तरीही आजही सर्दी, खोकला, श्लेष्मासाठी जे कफ सिरप विकले जातात त्यांचे काही संभाव्य हानिकारक परिणाम होऊ शकतात. डेक्सट्रोमेथोरफान रसायन (डेक्स्ट्रोमेथोर्फन -डीएक्सएम) सध्याच्या बहुतेक खोकल्याच्या सिरपमध्ये वापरलं जातं. याशिवाय प्रोमेथाझिन-कोडीन आणि बेंझोनॅटेटपासून कफ सिरप बनवले जातात. जरी ते संश्लेषित केलेले असतात आणि खोकल्याच्या सिरपमध्ये वापरले जाते, तरीही तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की DXM आणि प्रोमेथॅझिन (promethazine) हे कोडीन ओपिओइड घटक आहेत. म्हणजेच त्यात अफूचा वापर केला जातो. त्यामुळं नुकसान कशा प्रकारे होतं अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग अ‍ॅब्युज (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अ‍ॅब्यूज ट्रस्टेड सोर्स) नुसार, डीएक्सएमचा हॅल्युसिनोजेनिक (मतिभ्रम किंवा भास होणं) प्रभाव आहे. त्याचा थेट परिणाम मेंदूच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होतो. मायोक्लिनिकच्या मते, जेव्हा अफूपासून बनवलेला हा कृत्रिम पदार्थ रक्तप्रवाहात पोहोचतो, तेव्हा तो मेंदूच्या पेशींच्या रिसेप्टर्सला चिकटतो. त्यामुळं वेदना थांबण्याचे संकेत मिळतात आणि बरं वाटण्याची अनुभूती येते. मात्र, याच्यामुळं लगेच बरं वाटत असलं तरी याचं प्रमाण थोडंसं जरी जास्त झालं तरी त्याच्यामुळं हृदयाचं मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळं श्वासोच्छवासाचा वेग मंदावतो. मात्र, लगेच मिळणार्‍या आनंदाच्या भावनेमुळं लोकांना त्याची सवय लागू शकते. हे वाचा -  Coconut Benefits: रात्री झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील डॉक्टरकडे कधी जावं खोकला ही हवेतील हानिकारक पदार्थ शरीरात बाहेर टाकण्याची नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काहीवेळा खोकला आणि श्लेष्मा शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरतात. अशा स्थितीत कफ सिरपचा वापर केला जातो. पण कफ सिरपचे काही दुष्परिणाम देखील आहेत. WebMD नुसार, कफ सिरप प्यायल्यानंतर चक्कर येणं, डोकेदुखी, अस्वस्थता, भ्रम, झोप न लागणं यासारख्या तक्रारी असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे वाचा -  Sleeping Tips: या वेळात तुम्ही पालथं झोपण्याची चूक करत नाही ना? कमी वयातच वयस्क दिसाल कफ सिरप घेताना तुम्हाला मूड बदलणं, मतिभ्रम किंवा भास झाल्यासारखं होणं, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, हात व पाय थरथरणं आणि अशक्तपणा जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. शिवाय, त्वचेवर पुरळ, खाज किंवा कोणत्याही प्रकारची अ‌ॅलर्जी असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या