JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Coronavirus चा धोका; चेहऱ्याला हात लावण्यापासून स्वत:ला कसं रोखाल?

Coronavirus चा धोका; चेहऱ्याला हात लावण्यापासून स्वत:ला कसं रोखाल?

एका रिसर्चनुसार आपण 1 तासात किमान 20 वेळा चेहऱ्याला हात (face touch) लावता.

जाहिरात

A commuter uses his handkerchief to cover his face as he travels in a metro amid coronavirus fears, in New Delhi, India, March 17, 2020. REUTERS/Anushree Fadnavis - RC2NLF918MLG

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका टाळण्यासाठी चेह-याला हात लावणं (face touch) टाळा, असा सल्ला दिला जातो आहे. तुमच्या हातांनी अशा ठिकाणी स्पर्श केला असेल, जिथे कोरोनाव्हायरस आहेत आणि असे हात धुताच चेह-याला लावला तर डोळे, नाकातून व्हायरस तुमच्या शरीरात पोहोचेल. मात्र चेह-याला हात लावणं ही स्वाभाविक क्रिया आहे, जी आपल्या नकळत होत असते. त्यामुळे ही सवय रोखणं तसं थोडं कठीण आहे, मात्र अशक्य नक्कीच नाही. वाचा - बापरे! कोरोनापासून तुमचं संरक्षण करणा-या मास्कवर तब्बल आठवडाभर असतो व्हायरस अमेरिकेन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोल च्या अभ्यासानुसार 1 तासात आपण किमान 20 वेळा चेहऱ्याला हात लावतो. एका तासात चेहऱ्यावरील कोणत्या भागाला आपण किती वेळा, हात लावतो. केस - 4 डोळे - 3 कान - 1 नाक - 3 गाल - 4 ओठ - 4 मान - 1 चेहऱ्याला हात लावण्यासाठी कसं रोखाल? तुम्ही चेहऱ्याला हात लावलात तर तुम्हाला तसं करायची नाही याची आठवण तुम्हाला करून द्यायची असं एखाद्या व्यक्तीला सांगा. दिवसभरात चेहऱ्याला किती वेळा हात लावता ते मोजा आणि त्याची नोंद करा, स्वतःच स्वतःची सोय मोडा. चेह-याला स्पर्श करण्याची विविध कारणं असतात, ते कारण तुम्ही समजून घ्या. कारण समजलं तर असं करण्यापासून स्वत:ला रोखा. हात व्यस्त ठेवा, जेणेकरून ते चेहऱ्यापर्यंत जाणार नाही. मोकळ्या वेळेत हातांना व्यस्त ठेवण्यासाठी स्ट्रेस बॉल वापरू शकता. अन्य बातम्या वर मुंबईत, वधू दिल्लीत अन् वऱ्हाडी कॅनडाहून LIVE, एका लग्नाची डिजीटल गोष्ट ! चालता-फिरता महाल आहे हृतिकची नवी Mercedes-Benz, पाहा कारचे इनसाइड PHOTOS

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या