अभिनेता हृतिक रोशन त्यांच्या डान्स आणि अभिनयासोबतचं त्याच्या बाइक आणि कार कलेक्शनसाठी ओळखला जातो. नुकतीच त्यानं Mercedes-Benz V-Class कार खरेदी केली.
हृतिकची ही नवी Mercedes-Benz एखाद्या महालापेक्षा कमी नाही. या कारचं डिझाइन भारतातली सर्वात जुनी आणि प्रसिद्ध कार इंटिरिअर कंपनी DC2 ने केलं आहे.
कार इंटिरिअर कंपनी DC2 नं हृतिकच्या या कारचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत.
DC2 ने V-Class मध्ये Nappa लेदर अपहोल्स्ट्री, रूफ लाइटिंग, फोल्डेबल टेबल, वुडन फ्लोरिंग, मिनी फ्रिज आणि 32 इंच टीव्ही लावला आहे.
कस्टमाइज्ड किट मध्ये 4 सीट व्हाइट Nappa लेदर फिनिश करण्यात आल्या आहेत. रियर मध्ये दोन मेन सीट रिक्लाइनर्स आहेत.
या सीट इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल केल्या जाऊ शकतात. यासाठी सेंटर आर्म रेस्टवर बटण आहेत. या सीट स्वतंत्रपणेही कंट्रोल करता येतात. याशिवाय या कारमध्ये रियर फेसिंग जंप सीट सुद्धा आहेत.
Mercedes-Benz India ने V-Class ही कार 2019 मध्ये लॉन्ग व्हीलबेस वर्जन मध्ये लॉन्च केली होती. 2020 च्या Auto Expo मध्ये कंपनीने याच्या MarcoPolo एडिशन बद्दलही माहिती दिली होती.
V-Class च्या स्टँडर्ड एडिशनची एक्स शोरूम किंमत 68.4 लाख रुपये पासून सुरू होते.तर Auto Expo सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 1.10 कोटी होती. नंतर ती 1.38 कोटी करण्यात आली.
यात 2.1 लीटर टर्बो डीजल इंजिन आहे आणि ट्रांसमिशन ऑटोमेटिक आहे. इंजिन 160hp पॉवर आणि 380Nm चा टॉर्क जनरेट करतं.
DC2 ही दिपक छाब्रिया यांची कंपनी असून ही कंपनी त्यांच्या कस्टम व्हेइकल डिझाइनसाठी ओळखली जाते. हृतिकतच्या या कारच्या इंटिरिअरसाठी या कंपनीला 1 महिन्याचा कालावधी लागला.