लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन...एका सुखी संसाराची सुरुवात...परंतु, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक इच्छुक वधू आणि नवरदेव मंडळींना बोहल्यावर चढता आलं नाही. परंतु, मुंबईतील एका नववधू आणि नवरदेवाने नामी शक्कल लढवत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लग्न सोहळा उरकून टाकला.
मुंबईत राहणारे आणि नौदलात कार्यरत असलेले प्रित सिंग आणि दिल्ली राहणारी वधू नीत कौर यांचा आगळा वेगळा डिजीटल विवाह सोहळा पार पडला.
नवरा मुलगा हा मुंबईत होता तर नवरी मुलगी दिल्ली..त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लग्न करण्याचा निर्णय घेतला. 4 एप्रिल रोजी दोघांचाही लग्न सोहळा पार पडला.
या लग्न सोहळ्याला कॅनडा, दुबई आणि ऑस्ट्रेलियातील नातेवाईकही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
त्यानंतर लग्नाचा पुढचा विधीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच पार पडला. यावेळी सर्व नातेवाईक हा विवाह सोहळा पाहत होते.
लॉकडाउनमुळे घरात राहावं लागल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लग्नसोहळा उरकावा लागला. परंतु, यामुळे लग्नांवर होणारा वारेमाप खर्चही आटोक्यात आला.