JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लॅबमध्ये तयार होऊ शकतो प्रेमाचा फॉर्म्युला? पाहा काय आहे 'केमिकल लोचा'!

लॅबमध्ये तयार होऊ शकतो प्रेमाचा फॉर्म्युला? पाहा काय आहे 'केमिकल लोचा'!

प्रेम (Love) ही भावना मनाशी (Heart) निगडीत आहे. मेंदू, बुद्धी (Brain) याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. प्रेमात फक्त मनाची हुकुमत चालते असं मानलं जातं. पण प्रत्यक्षात प्रेमभावना मनात निर्माण होण्यामागे शरीरातील काही हॉर्मोन्स (Harmones) आणि मेंदूतील रासायनिक (Chemicals) घडामोडी कारणीभूत असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : प्रेम (Love) ही भावना मनाशी (Heart) निगडीत आहे. मेंदू, बुद्धी (Brain) याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. प्रेमात फक्त मनाची हुकुमत चालते असं मानलं जातं. पण प्रत्यक्षात प्रेमभावना मनात निर्माण होण्यामागे शरीरातील काही हॉर्मोन्स (Harmones) आणि मेंदूतील रासायनिक (Chemicals) घडामोडी कारणीभूत असतात. मिर्झा गालिबनंही (Mirza Galib) शतकापूर्वी हे रहस्य उलगडलं होतं, त्यानं सांगितलं होतं, ‘कहते है इश्क जिसे,खलल है दिमाग का.’ मात्र प्रेमाच्या भावनिक प्रभावामुळे अनेक व्यवसाय जोरात चालतात. त्यामुळे प्रेमरोगामागचं वैज्ञानिक कारण फारसं उजेडात येत नाही. प्रेम हे फक्त मनाची भाषा जाणतं, असं म्हटलं जातं; पण प्रेमाची ही भावना मनात निर्माण होण्यामागे कारणीभूत असतात ती मानवी शरीरात असलेली काही रसायनं आणि विशिष्ट प्रकारचे हॉर्मोन्स. याबाबत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, प्रेमाच्या भावना तीन टप्प्यात प्रभावित करतात. पहिल्या टप्प्यात एखाद्या व्यक्तीला कोणालातरी प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. या काळात मेंदूद्वारे टेस्टोस्टेरॉन (Testosterone) आणि एस्ट्रोजेन (Estrogen) या हॉर्मोन्स निर्मितीच्या वेगवान निर्मितीचे संदेश मेंदूकडून दिले जातात. याला तुम्ही वासनाही म्हणू शकता. दुसऱ्या टप्प्यात त्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होतं. या दरम्यान, डोपामाइन (Dopamine), नॉरपेनेफ्रिन (norepinephrine) आणि सेरोटोनिन (serotonin) नावाचे हॉर्मोन्स निर्माण होतात. डोपामाइनमुळे भावना निर्मिती होते. म्हणजे बक्षीस जिंकलं तर तुम्हाला आनंद होतो. तर नॉरपेनेफ्रिन ऊर्जा निर्माण करते. यामुळे भविष्याची स्वप्ने पडू लागतात आणि तुम्ही भूक, तहान आणि झोपही विसरून जाता. सेरोटोनिनमुळे तुमचा मूड चांगला राहतो. यापुढचा तिसरा टप्पा म्हणजे एखाद्याबद्द्द्ल खूप जवळीक वाटणं. यासाठी ऑक्सिटोसिन (oxytocin) आणि व्हॅसोप्रेसिन (vasopressin) ही दोन रसायनं जबाबदार आहेत. मात्र या टप्प्यावर पोहोचण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातून सुरक्षितपणे बाहेर पडणं आवश्यक आहे. ऑक्सिटोसिन प्रेमात स्थिरता आणि परिपक्वता (maturity) आणतं. ऑक्सिटोसिनमुळे फक्त स्त्री-पुरुष यांच्यातील प्रियकर-प्रेयसीच्या नात्यातील प्रेमभावना निर्माण होत नाही, तर आई-वडिलांचे मुलांबद्दलचे प्रेम, मैत्री आणि समाजातील अन्य लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठीदेखील हे हॉर्मोन जबाबदार आहे. प्रिय व्यक्तीला मिठी मारल्यावर होणारा आनंद हा या हॉर्मोनचा परिणाम असतो. या सगळ्या हॉर्मोन्स, रसायनांच्या खेळामुळे प्रेमाचा फॉर्म्युला प्रयोगशाळेत (Lab) तयार करता येणं शक्य आहे. या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही आनंदी होऊ शकता. प्रेमाची भावना जागृत झाल्या हृदयात घंटा किंवा व्हॉयलीन वाजतं हा सगळा मनाचा खेळ असतो. मेंदूची डावी बाजू आपल्या भावनांना जबाबदार असते. विज्ञानाच्या भाषेत त्याला लिंबिक सिस्टीम म्हणतात. एखाद्याला बघितल्यावर मेंदूच्या या भागात रसायनांचं एक कॉकटेल तयार होतं आणि त्यामुळे आनंदाची भावना निर्माण करणारी हॉर्मोन्स बाहेर पडू लागतात. यामुळे सगळं जग सुंदर, आकर्षक आणि चांगलं वाटू लागतं. तर कॉर्टिसॉल (cortisol) या हॉर्मोनमुळे तणावाची भावना निर्माण होते त्यामुळे याला स्ट्रेस हॉर्मोन असंही म्हणतात. प्रेमात तुम्हाला उदास वाटू लागलं तर तुम्ही या हॉर्मोनला जबाबदार ठरवू शकता. जीवशास्त्र (Biology) आणि रसायनशास्त्रामुळे (Chemistry) प्रेमाच्या भावनेमागचं विज्ञान आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल; पण यामुळे प्रेम म्हणजे काय हे समजू शकतं? प्रेम म्हणजे नेमकं काय याची व्याख्या करता येईल? संत कबीरांनी त्यांच्या एका दोह्यात म्हटलं आहे ‘प्रेम गली अति संकरी जा में दो ना समान’ असं म्हटलं आहे. म्हणजेच प्रेमाचा हा मार्ग इतका अरुंद आहे की त्यात दोघांना स्थान नाही आणि एकाला यात समर्पित व्हावं लागेल. प्रेमात पडल्यानंतर तुम्हाला मोकळं वाटत नसेल आणि दुसऱ्यालाही मोकळं वाटू दिलं जात नसेल तर तुमचं प्रेम हे फक्त काही रासायनिक बदलांचा परिणाम आहे आणि आणखी काही नाही. प्रेमाची सुरुवात मनापासून होते आणि ते किती टिकेल हे देखील मनच ठरवते. काही वर्षांपूर्वीपर्यंत, जेव्हा इंटरनेट क्रांती नव्हती, तेव्हा भावना एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रे पाठवावी लागत होती. अनेक बंधनांनी जखडलेल्या समाजात प्रेम करणं इतकं सोपं नव्हतं. नाती तयार होण्यासाठी वेळ द्यावा लागत असे त्यामुळं ती तोडण्याआधी विचार करायलाही वेळ दिला जात असे. मात्र आजच्या इंटरनेटच्या वेगवान काळात इन्स्टंट माहिती, इन्स्टंट मेसेजिंग आणि इन्स्टंट इमोशन्स यामुळे प्रेमाचा काळ कमी होत चालला आहे. प्रेम होतं ही झटपट आणि संपतही झटपट. मोबाईल फोन आधी बदलणार की तुमचा पार्टनर आधी बदलणार हे ठरवणं कठीण आहे. कारण कृती आणि प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी तुमची मोबाईलवर चालणारी बोटं म्हणजेच इन्स्टंट मेसेजिंग (Instant messaging) ठरवतात. व्हिडीओ कॉल्स आणि ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून खऱ्याखोट्याची शहानिशा केली जाते. तज्ज्ञांच्या मते, आजकाल प्रेमदेखील एखाद्या व्यसनाप्रमाणे मनावर कब्जा करत आहे. तेही एक व्यसन ठरू लागलं आहे. त्यामुळे प्रेम हे उत्कट न राहता अतिरेकी वर्चस्व भावना गाजवणारं ठरतं. त्यामुळे आजकाल नाती अपयशी ठरण्याचं, एकतर्फी प्रेमाचं तसंच ब्रेकअपचंही प्रमाण वाढलं आहे आणि यातूनच गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढत आहे. प्रेमात समर्पणाची भावना न राहता हिसकावण्याची, अधिकाराची भावना तीव्र होत आहे. हे आजच्या पिढीचं दुर्दैव आहे, असं म्हणावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या