JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / डायबेटिस रुग्णांनी आंबा खावा का? तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

डायबेटिस रुग्णांनी आंबा खावा का? तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

मधुमेह असलेल्यांना आंबा खावा की नाही, याबद्दल कायम साशंकता असते. याबद्दल तज्ज्ञ काय सल्ला देतात, ते जाणून घेऊयात.

जाहिरात

मधुमेह असणाऱ्यांनी आंबा खावा का?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 04 मे : उन्हाळा सुरू आहे आणि आंब्याचा सीझन आहे. सर्वांच्या घरी गोड, पल्पी, लज्जतदार, सुगंधी आंबे आणले जात असतील. फक्त उन्हाळ्यातच आंबे येतात, त्यामुळे प्रत्येकाला भरभरून आंबे खायचे असतात. हापूस ते दशेहरीपर्यंत भारतात 1,500 हून अधिक प्रजातींचे आंबे आढळतात. आंब्याच्या प्रत्येक जातीला एक अनोखी चव असते. पण, मधुमेह असलेल्यांना आंबा खावा की नाही, याबद्दल कायम साशंकता असते. याबद्दल तज्ज्ञ काय सल्ला देतात, ते जाणून घेऊयात. या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय. “अनियंत्रित मधुमेह असलेल्या पेशंटनी कैरी खाल्ली तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. पिकलेला आंबा साखरेची पातळी वाढवतो. त्यामुळे आंबा खाण्याच्या काही पद्धती आहेत,” असं डॉ. मोहन डायबेटिस स्पेशॅलिटी सेंटरचे चेअरमॅन व चिफ डायबेटॉलॉजिस्ट डॉ. व्ही. मोहन म्हणाले. डायबेटिस पेशंटही आंबे खाऊ शकतात डायबेटिस रुग्णानी आंबा खावा का असं विचारलं असता, बॉम्बे हॉस्पिटलमधील कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट डॉ. राहुल बक्षी यांनी त्यांच्या एका रुग्णाची आठवण करून दिली. त्यालाही असाच प्रश्न पडला होता. “6 महिन्यांपासून मी त्याला पाहत होतो आणि लाइफस्टाइलमधील योग्य बदल, डाएट्री अॅडव्हाईस व नियमित चालण्याने त्याचे HbA1C 10.4% वरून 6.8% झालं. इंटरनेटवर आंबा पोटभर खा आणि अजिबात खाऊ नका असे सल्ले दिले गेले आहेत,” असं डॉ. बक्षी म्हणाले. आंबे योग्य पद्धतीने खा “तुमची ग्लुकोजची लेव्हल नियंत्रणात असेल, तर तुम्ही आंबे खाऊ शकता, पण ते योग्य वेळी व योग्य पद्धतीने खायला हवेत. “एका आंब्यात 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि आदर्शपणे एक व्यक्ती दररोज फळांमधून एकूण 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट घेऊ शकते,” असं डॉ. बक्षी म्हणाले. “काही आंबे फार गोड नसतात, तर काही आंबे खूप गोड असतात. मात्र, लोक त्यांच्या भागात मिळणारे आंबे खातात. आंब्यांचे प्रकार खाताना त्यात थोडा संयम ठेवणं चांगलं, ते जास्त खाऊ नयेत,” असं डॉ. मोहन म्हणाले. आंब्यात कॉम्प्लेक्स व साधे कार्बोहायड्रेट्स दोन्ही प्रकार भरपूर प्रमाणात असतात रजिस्टर्ड डाएटिशियन उज्ज्वला बक्षी यांनी मधुमेहींनी आंबे का खावेत, याचं कारण सांगितलं आहे. “मधुमेहाच्या रूग्णांना आंब्याच्या पौष्टिकतेचा फायदा होऊ शकतो. फक्त त्यांनी रक्तातील साखरेचं प्रमाण आणि पोटॅशियमसारख्या इतर घटकांची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी ते डाएटिशियनचा सल्ला घेऊ शकतात,” असं उज्ज्वला बक्षी म्हणाल्या. तज्ज्ञ म्हणतात, आंब्यामध्ये 67% व्हिटॅमिन सी असतं ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं. आंब्याचा मॉडरेट ग्लायसेमिक इंडेक्स 55 आणि ग्लायसेमिक लोड सुमारे 5 असतो, त्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुरक्षित आहे. मधुमेही अर्धा कप आंबा रोज खाऊ शकतात. हापूस, पायरी या आंब्यांमध्ये जीआय कमी असतो. “आंब्याचे सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो पारंपरिकपणे कापून खाणं होय. हे आंब्यातील कार्बोहायड्रेट्सच्या पचनास मदत करतं. तसेच फळ कापून खाल्ल्याने खाण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे समाधान व तृप्ती मिळते. याउलट, मँगो शेक किंवा ज्युस प्यायल्याने आपल्याला जास्त प्रमाणात खाण्याची इच्छा निर्माण होते आणि फळाची चव चाखता येत नाही,” असंही त्या म्हणाल्या. “डायबेटिक पेशंटने आंब्याचे सेवन दिवसाला अर्ध्या आंब्यापर्यंत मर्यादित ठेवणं चांगलं आहे कारण त्यापलीकडे खाल्ल्यास बहुतेक लोकांमधील साखरेची पातळी वाढते. हे सर्व तुमच्या डायबेटिसच्या प्रकारावर अवलंबून आहे. असे काही लोक आहेत, ज्यांची साखर आंबा खाल्ल्यानंतरही नियंत्रित राहते तर काहींना आंबा खाल्ल्यास ती वाढू लागते,” असं डॉ. मोहन सांगतात. ते आंबा कापून खाण्याचा सल्लाही देतात. जेवणानंतर किंवा मिष्टान्न, डेझर्ट म्हणून आंब्याचं सेवन करू नका. जेवणामध्ये आंबा खा. ते दही, दूध यासारख्या प्रोटिनसह एकत्र घ्या, असा सल्ला डॉ. राहुल बक्षी देतात. आंबे केव्हा खाऊ नये? “अनियमित ब्लड शुगर, हाय पोटॅशियम लेव्हल असलेल्या व्यक्तींनी सरसकट आंबा खाऊ नये. त्यांनी हेल्थकेअर प्रोफेशनल्सच्या सल्ल्यानुसारच आणि सांगितला तेवढाच आंबा खावा,” असं उज्ज्वला बक्षी सांगतात. डॉ मोहन म्हणतात, जर शुगर पूर्णपणे अनियंत्रित असेल आणि शुगरचे प्रमाण आधीच जास्त असेल, तर आंबा खाण्यापूर्वी ती पातळी खाली आणली पाहिजे. टेकअवे उज्ज्वला बक्षी म्हणाल्या, “आंबा हे हंगामी फळ असल्याने सर्वांनीच त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. ज्यांना आंबे आवडतात, त्यांनी ते प्रमाणात खायला पाहिजेत. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी जेवणात एकूण कार्बोहायड्रेट मोजले पाहिजेत. रक्तातील साखरेचं प्रमाण दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी अन्न खाल्ल्यानंतर दोन तासांनी वाढते. त्यामुळे आंबा कापून खाल्ल्याने किंवा रस खाल्ल्याने त्यांना चवीबरोबरच पौष्टिक फायदे मिळवण्याचं कौशल्य विकसित करण्यासही नक्कीच मदत करू शकतं.” “जर मधुमेही व्यक्ती आंबा खात असेल, तर तो/ती इतर कार्बोहायड्रेट (उदा. तांदूळ किंवा चपाती) सेवन कमी करू शकतो, कारण त्यामुळे एकूण ग्लायसेमिक भार कमी होण्यास मदत होईल. आंब्याचे भरपूर पौष्टिक फायदे आहेत. अनियंत्रित मधुमेह आहे, त्यांच्या साखरेची पातळी वाढते. म्हणून, आंब्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे चांगले आहे,” असं डॉ. मोहन म्हणाले. आंबे खाण्याची योग्य वेळ कोणती? मॉर्निंग वॉक, वर्कआउटनंतर आणि जेवण करताना फळं खाता येतात. तुम्ही जेवणासोबत आंब्याची कोशिंबीरसुद्धा खाऊ शकता, त्यात कोथिंबिरीची पानं, काकडी, नट, बिया घालून खाऊ शकता. “जेवणाताना आंबा खाणं चांगलं आहे, कारण त्या वेळी रक्तातील साखरेची पातळी फारशी वाढू शकत नाही,” असं डॉ मोहन म्हणतात. जेवणानंतर डेझर्टप्रमाणे आंबे खाऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या