सार्वजनिक शौचालयामध्ये सर्वसमावेशकता
अशी कल्पना करा की आपण एका गर्दी असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये प्रवेश करत आहात आणि तुमची पावले कुजबूज आणि खुसफूस यामुळे थांबली आहेत. सगळे लोक आपल्याला जोखत आहेत याची जाणीव तुम्हाला कोशामध्ये नेते आणि असे वाटते की या संपूर्ण जगाचे ओझे आपल्या खांद्यावर आहे. ही तुमच्याकडून अनवधानाने झालेली कोणतीही चूक नाही, तर हे केवळ आपली स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करणे आहे. हे मार्मिक वास्तव जे कोणालाही एखाद्या उत्तम कथेतील उताऱ्या सारखे वाटेल, ते LGBTQ+ समाजातील अनेक व्यक्तींसाठी, विशेषत: जे ट्रान्सजेंडर किंवा नॉन-बायनरी आहेत, त्यांच्यासाठी दैनंदिन जीवनातील संघर्ष आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याची एक साधारण कृती, जी मानवी अस्तित्वाची गरज आहे ती चिंता आणि भीती वाटणारी परीक्षा बनते. 21व्या शतकात झेप घेतलेला समाज म्हणून आपल्यासाठी आधी कधीही पेक्षा जास्त आत्ता, हे अत्यावश्यक झाले आहे की आपण अशा प्रसंगाला सामोरे जावे, ज्ञानाने स्वत:ला सशस्त्र बनवावे आणि सार्वजनिक शौचालयांमध्ये LGBTQ+ समावेशकतेवरील चर्चेवर साचलेल्या गैरसमजांचे मळभ दूर करावे. गैरसमज जवळून समजून घेऊ या सीसजेंडर व्यक्तींसाठी सुरक्षा चिंता एक गैरसमज ज्याने खूपच जम बसवला आहे ते असे आहे की असा समज की ट्रान्सजेंडर व्यक्तींनी त्यांचे लिंग जुळणाऱ्या व्यक्तींचे शौचालय वापरले तर त्यामुळे सीसजेंडर व्यक्तींची सुरक्षा धोक्यात येते. तथापि, संशोधन आणि आकडेवारी हा गैरसमज जोरदारपणे खोडून काढतात. प्रत्यक्षात, ट्रान्सजेंडर व्यक्तीच बाथरूममध्ये हिंसाचाराला बळी पडण्याची शक्यता जास्त असते. नॅशनल सेंटर फॉर ट्रान्सजेंडर ईक्वॅलिटी यांच्या एका सर्वेक्षणानुसार, ज्यामध्ये 27,715 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्याच्या निष्पत्ति मध्ये असे आढळून आले आहे की सार्वजनिक शौचालयात सुमारे 12% ट्रान्सजेंडर व्यक्तींचा शाब्दिक छळ झाला, 1% व्यक्तींवर शारिरीक हल्ले झाले आणि 1% व्यक्तींवर लैंगिक अत्याचार झाले. ट्रान्सजेंडर व्यक्ती हल्लेखोर एक अत्यंत हानिकारक आणि निराधार गैरसमज हा आहे की ट्रान्सजेंडर व्यक्ती लैंगिक हल्लेखोर असण्याची शक्यता असते. ही कल्पना केवळ निराधारच नाही तर ती एक डाग देखील कायम ठेवते ज्यामुळे ट्रान्सजेंडर लोकांच्या मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. लिंग-तटस्थ शौचालये आणि गोपनीयता लिंग-तटस्थ स्वच्छतागृहे म्हणजे गोपनीयतेची कमतरता असलेल्या खुल्या जागा, या गैरसमजाच्या विरुद्ध, ते सर्वांसाठी गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वैयक्तिक स्टॉल्ससह डिझाइन केलेले असतात. महिलांसाठी, अशा जागांचा अर्थ शौचालयांची अधिक उपलब्धता असा देखील असू शकतो - कारण स्टेडियममध्ये गर्दीने भरलेल्या बाथरूममध्ये जाण्यासाठी रांगेत उभी असलेली कोणतीही महिला हे सांगेल की पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृहांचे प्रमाण खूप व्यस्त आहे. लिंग-तटस्थ शौचालयांना स्वीकारून आपण सगळेच शौचालयात लवकर जाऊ शकतो. निवडीचा गैरसमज काही व्यक्ती ट्रान्सजेंडर किंवा नॉन बायनरी असणे हा एक निवडीचा भाग आहे असा चुकीचा समज बाळगतात. असा विचार करा की जर ती निवड असेल तर ते किती सोपे होईल - जर तुम्ही एक पुरुष असाल ज्याला तो स्त्री शरीरात अडकल्यासारखे वाटत असेल आणि तुम्ही एखाद्या पुरुषासारखे वाटणे ‘निवडले’ असेल, तर मग जगाचा मार्ग खूपच सोपा होईल नाही का? जेव्हा ते तुम्हाला अनुकूल असेल तेव्हा तुम्ही एक पुरुष बनण्याची ‘निवड’ करणार नाही का? विशेषत: तेव्हा जेव्हा शौचालयात प्रवेश करणे ही गोष्ट निवडण्यासारखी एखादी सामान्य गोष्ट असते? हे सत्यापासून खूपच दूर आहे. लिंग ओळख हा एखाद्या व्यक्तीच्या स्व भावनेचा एक मूलभूत पैलू आहे. हे एक असे वास्तव आहे जे आपल्यापैकी अनेक जण ओळखत नाहीत (किंवा करू शकत नाहीत), कारण आपल्याला अशा शरीरात जन्म घेण्याचा विशेषाधिकार आहे जे जैविक दृष्ट्या आपली ओळख प्रतिध्वनीत करतात. आपल्याला कधीही आरशात पाहिल्यावर तिथे स्वतः प्रतिबिंबित न झाल्यामुळे उद्भवणाऱ्या डिसमॉर्फियाशी आपल्याला कधीही संघर्ष करावा लागलेला नाही. याचा आदर आणि स्वीकार करणे मनुष्याच्या प्रतिष्ठेसाठी आवश्यक आहे. ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि अपंग शौचालये ट्रान्सजेंडर व्यक्तींनी केवळ अपंगांची शौचालये वापरावीत असे सुचवणे केवळ कलंकित करणारेच नाही तर त्यांच्या लिंग ओळखीशी संबंधीत सार्वजनिक सुविधा वापरण्याच्या त्यांच्या अधिकारांकडेही दुर्लक्ष करते. ट्रान्स किंवा नॉन-बायनरी असणे हे काही अपंगत्व नाही; ती एक ओळख आहे. आपण त्यांना अपंग शौचालय वापरण्यास का सांगावे? खर्चाची चिंता सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सर्वसमावेशकतेला सामावून घेणे खर्च-प्रतिबंधक आहे हा युक्तिवाद दूरदर्शी नाही. शौचालये ही सार्वजनिक सुविधा आहेत. भारतासारख्या देशात, जिथे प्रत्येक भारतीयाला शौचालय सुविधा मिळावी हे सुनिश्चित करणे हे आपण आपले ध्येय बनवले आहे, तेथे खर्च सामाजिक परिणामांपेक्षा वरचढ आहे. सुरक्षित प्रसाधनगृह वापरल्यामुळे आपण सर्व सुरक्षित होतो – हल्ला, लैंगिक शिकार आणि रोग यापासून. आपल्यापैकी कोणीही उघड्यावर शौचास जातो तेव्हा आपण सर्वांवर रोगाचा भार वाढतो. जेव्हा आपल्यापैकी कोणावरही हल्ला होतो किंवा लैंगिक त्रास दिला जातो तेव्हा आपल्या सर्वांसोबत असाच गुन्हा घडण्याची शक्यता निर्माण होते. मग आपण खर्च कशावर केला पाहिजे? शौचालय, की ती नसल्यामुळे होणाऱ्या त्रासावर उपचार करण्यावर? लिंग ओळखीची सत्यता ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या लैंगिक ओळखीच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे अपमानास्पद आणि अवैध दोन्ही आहे. हे आपल्याला लिंग ओळख आणि जीवशास्त्रीय रचना एकच आहे या गैरसमजाकडे परत घेऊन नेतो. जर तुम्ही सीसजेंडर म्हणून ओळखले जात असाल तर त्याचे कारण आहे की तुम्हाला तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी आहात हे तुमच्या जन्मापासून संगितले गेले आहे. तुमची ओळख मुलगा म्हणून किंवा मुलगी म्हणून जी ओळखीतून आणि आतून आलेल्या उत्स्फूर्त प्रमाणीकरणाद्वारे तयार झाली आहे ज्याने तुमची ओळख निश्चित केली आहे. ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी लोकांनासुद्धा असेच सांगितले गेले, परंतु त्या आतल्या आवाजाने त्यांची ती ओळख प्रमाणित केली नाही. तुम्हाला केवळ एका मार्गाने ओळखणाऱ्या जगासमोर उभे राहणे तितकेसे सोपे नाही. स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी प्रचंड धैर्य लागते जेथे विरोध केला जातो: सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर. हे एक असे पाऊल नाही जे कोणी सहजपणे घेऊ शकते. एखाद्या व्यक्तीने बाहेर पडण्यासाठी आणि त्यांचे खरे स्वत्व जगासमोर मांडण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते. हा एक असा संघर्ष आहे ज्याला आपल्यापैकी बहुतेकांनी मागे टाकले आहे, आणि म्हणून, त्याला पाहण्याची खिडकी उपलब्ध नाही. आणि तरीही, आपल्याला माहिती आहे की पण कोण आहोत. मग ट्रान्स आणि नॉन-बायनरी लोकांना ते देखील कोण आहेत हे कळेल हे इतके आश्चर्य वाटण्यासारखे का बनले आहे? एक असे टॉयलेट जे जीवन बदलेल मागील ५-८ वर्षांत भारताने स्वच्छतेच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती बघितली आहे. स्वच्छ भारत मिशन हे या बदलाचे आश्रयदाता आहे, ज्याने भारताला माझा देश म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी सन्मान आणि स्वच्छता हे केवळ शब्द नसून मूर्त वास्तव असल्याची खात्री करण्यासाठी देशभरात लक्षावधी शौचालये बांधली आहेत. या बदलामुळे सशक्त झालेल्या अंक आवाजांपैकी, LGBTQ+ समुदाय एका अनोख्या मार्मिकतेने प्रतिध्वनीत होतो आहे. त्यांच्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे ही केवळ एक सुविधा नसून ती सुरक्षितपणाची राखीव क्षेत्रे आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाची पावती आहेत. जेव्हा ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी व्यक्ती कोणत्याही चिंतेशिवाय आणि कोणत्याही शिक्क्याशिवाय या जागेत जाऊ शकतात तेव्हा ते मनापासून स्वीकारले जाते. पण कोणत्याही बदलाच्या प्रवासाप्रमाणेच त्याची स्वतःची आडवळणे असतात. दगड विटा तर जागेवर बसल्या आहेत परंतु त्यांचा स्वीकार करण्यासाठी लागणारी मोकळी मने अजूनही तयार होत आहेत. हार्पिक हा ब्रँड ज्याने स्वच्छतेचा एक समानार्थी शब्द म्हणून भारतीयांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, त्याने या बदलाला स्वतः पुढे नेण्याचा निर्णय घेतला. सर्वसमावेशकता आणि स्वच्छता या दोहोंचे महत्त्व समजून घेऊन, हार्पिक आपल्या वैविध्यपूर्ण आणि सुंदर देशातील अगदी LGBTQ+ समुदायासह प्रत्येकाला सेवा पुरवणारी उत्पादने बनवते. हार्पिकच्या हे सुद्धा लक्षात आले आहे की एकत्र काम केल्याने बदल आणखी मजबूत होतो. म्हणूनच, तीन वर्षांपूर्वी, हार्पिक ने न्यूज18 सोबत एकत्र येऊन मिशन स्वच्छता और पानी सुरू केले. हा प्रकल्प केवळ शौचालये स्वच्छ ठेवण्यासाठी नाही; हे एकमेकांसाठी प्रेम, स्वीकृती आणि समर्थन दर्शवण्याबद्दल आहे. ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी समुदायाची बाजू घेऊन, मिशन स्वच्छता और पाणी हे सर्वसमावेशक सार्वजनिक शौचालयांचे महत्त्व अधोरेखित करते. निष्कर्ष आणि म्हणून, स्वीकृतीच्या लाटा पूर्वाग्रहाच्या दगडांची झीज करत असताना, आपण रत्ने गोळा करूया आणि अशा किनाऱ्याकडे जाऊया जिथे स्वीकृती निरपेक्ष आहे. मिशन स्वच्छता और पानी यांसारख्या संवाद आणि शैक्षणिक मोहिमेद्वारे चला आपण एक असा समाज घडवूया जो ‘इतरांना’ नाही तर ‘स्वतःला’ ओळखतो. या राष्ट्रीय संवादामध्ये तुम्ही कसा सहभाग घेऊ शकता याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला येथे सामील व्हा.