JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अडथळे काढून टाकणे: सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये LGBTQ+ समाजाचा होणारा छळ आणि भेदभाव संबोधित करणे

अडथळे काढून टाकणे: सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये LGBTQ+ समाजाचा होणारा छळ आणि भेदभाव संबोधित करणे

सार्वजनिक शौचालये ही सर्वांची मूलभूत गरज आहे. तरीही, LGBTQ+ समुदायातील अनेकांसाठी, ते त्वरीत भितीदायक आणि धोकादायक ठिकाणांमध्ये बदलू शकते.

जाहिरात

LGBTQ+

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सार्वजनिक स्वच्छतागृहे सर्वांसाठी मूलभूत गरज आहेत. असे असले तरी, LGBTQ+ समाजातील असंख्य व्यक्तींसाठी, ही जागा भितीदायक, धोकादायक ठिकाणामध्ये रूपांतरित होऊ शकते. यासाठी फक्त चुकीची व्यक्ती, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी असावी लागते. तुम्ही असे पहा, ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी लोक स्वतःला पुरुष किंवा स्त्री म्हणून पाहत नाहीत. सार्वजनिक शौचालये ज्या दुहेरी साच्यामध्ये येतात त्यामध्ये ते बसत नाहीत. सार्वजनिक स्वच्छतागृहांची रचना ऐतिहासिकदृष्ट्या लिंगाच्या दुहेरी कल्पनेभोवती केली गेली आहे, अंतर्निहितपणे लिंग ओळखीच्या विविधतेकडे दुर्लक्ष करून ज्यामध्ये ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी, जेंडरक्वियर, इंटरसेक्स आणि लिंग पक्के नसलेले व्यक्ती अंतर्भूत आहेत. ट्रान्सजेंडर व्यक्ती ही अशी व्यक्ती असते जी तिच्या जन्माच्या वेळी नियुक्त केले गेलेल्या लिंगापेक्षा भिन्न लिंग ओळख बाळगते. दुसऱ्या बाजूला, नॉन-बायनरी व्यक्ती, पुरुष किंवा स्त्री म्हणून काटेकोरपणे ओळख बाळगत नाहीत. त्यामुळे, मग ते महिलांच्या शौचालयात जावोत की पुरुषांच्या… ते ‘चुकीच्या’ स्वच्छतागृहात असतात. ‘चुकीच्या’ स्वच्छतागृहामध्ये असल्याने त्यांना सर्व प्रकारच्या अपमान, शिवीगाळ आणि कधी कधी हिंसाचाराचा सामना करावा लागतो. ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स आणि नॉन-बायनरी व्यक्तींना सहसा लिंगनिहाय स्वच्छतागृहामध्ये सामान्य अनुभव येतात. हे अनुभव नियमितपणे येतात आणि त्यात समाविष्ट असते: ट्रान्सजेंडर स्त्रिया, विशेषत: ज्यांचे शरीर दिसायला पुरुषी आहे, कदाचित त्यांना अन्यायकारकपणे हल्लेखोर किंवा धोकादायक नाव दिले जाऊ शकते आणि पुरुषांच्या शौचालयाचा वापर करण्यास किंवा तेथून (स्त्रियांचे स्वच्छतागृह) सोडून जाण्यास भाग पाडले जाईल.

एका क्षणासाठी, स्वतःला ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स किंवा नॉन-बायनरी व्यक्ती असल्याचे समजा. स्वतःला विचारा: तुम्ही स्वच्छतागृहामध्ये तरी जाल का? किंवा ऑफिस दिवसभर असतानासुद्धा तुम्ही काहीही खाणार किंवा पिणार नाही, जेणेकरून तुम्ही शांतपणे, म्हणजे घरच्या स्वच्छता गृहात जाऊ शकाल? उत्तर स्पष्ट आहे, नाही का? आता याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल याचा विचार करा: मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या. युनायटेड स्टेट्समध्ये केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की 59% ट्रान्सजेंडर किंवा लिंग-विविध सहभागींनी हल्ल्याच्या भीतीमुळे सार्वजनिक शौचालय वापरणे टाळले. दुसर्‍या अभ्यासानुसार, स्वच्छतागृह भेदभाव अनुभवलेल्या ट्रान्सजेंडर आणि/किंवा नॉनबायनरी तरुणांमध्ये, 85% व्यक्तींनी नैराश्यपूर्ण मनःस्थिती नोंदवली आणि 60% व्यक्तींनी आत्महत्येचा विचार गंभीरपणे केला. हे अनुभव भारतासह जगभरातील ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी लोकांद्वारे प्रतिध्वनित केले जातात. अजून काही गोष्टी आहेत. शारीरिक परिणामही यात अंतर्भूत असतात. आपल्याला माहित आहे की, ‘हे धरून ठेवल्याने’ मूत्रमार्गात संक्रमण, मूत्रपिंड समस्या आणि इतर संबंधित आरोग्य समस्या होऊ शकतात. त्यांनी अन्न आणि पाण्याचे सेवन देखील प्रतिबंधित केल्यामुळे, यापैकी अनेक व्यक्तींना पोषण कमतरता आणि पोटाच्या समस्या देखील होतात. आपल्या भारतातील उष्ण हवामानामुळे, निर्जलीकरण ही देखील मोठी समस्या आहे. लिंगानुसार असलेली स्वच्छतागृह ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स आणि नॉन-बायनरी व्यक्तींना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्राचा आकार कमी करण्यास भाग पाडतात. असा विचार करा की - तुम्ही तुमच्या मूत्राशयामुळे विचलित झाला आहात, तुम्ही स्वच्छता ब्रेक घेण्याची योग्य वेळ कधी आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत दररोज भरपूर ऊर्जा खर्च करत आहात, तुम्ही चिंताग्रस्त आहात. तुम्ही कामासाठी तुमचे सर्वोत्तम द्याल का? नाही. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला बाहेर जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला माहीत नाही की तुम्ही तिथले टॉयलेट वापरू शकाल की नाही… आणि तुम्हाला खरोखरच गोंधळ करायचा नसतो. आपण लांब चित्रपटासाठी बाहेर जाऊ शकत नाही - आपण परतीच्या मार्गावर ट्रॅफिकमध्ये अडकल्यास आणि सार्वजनिक शौचालय वापरण्याची गरज पडली तर काय? कुठे थांबणार? आपण कुठे थांबू शकता? कुठेही नाही. तुम्ही कुठेही गेलात तरी, तुम्ही फक्त ‘चुकीच्या’ टॉयलेटमध्ये जाल. धोरण आणि सामाजिक परिवर्तनाद्वारे सर्वसमावेशकतेच्या पुनर्जागृतीला चालना देणे या समस्येचे निराकरण करण्यासाठी धोरणात्मक सुधारणा आणि सामाजिक परिवर्तनाची एकत्रीत जोडणी आवश्यक आहे. मोठ्या स्तरावर, या रणनीतीचे तीन मुद्दे आहेत: धोरणात्मक बदल बदल होत आहे. आपण कलम 377 विरुद्ध लढलो आणि जिंकलो आहोत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच त्यांच्या आवारात नऊ लिंग-तटस्थ स्वच्छतागृहे उभारली आहेत. दिल्लीत, सरकारने सर्व विभाग, कार्यालये, जिल्हा प्राधिकरणे, महानगरपालिका, सरकारी कंपन्या आणि दिल्ली पोलिस यांच्याकडे ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी स्वतंत्र आणि विशेष शौचालये असणे अनिवार्य करून सर्वसमावेशकतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जगातील इतर अनेक भागांप्रमाणे, भारतात, आपल्याला सरकार आणि धोरणाशी लढा देण्याची गरज नाही - भारत एक असे राष्ट्र आहे ज्याला त्याची विविधता ही प्रमुख शक्ती असल्याचा अभिमान आहे. धोरणे आहेत, अंमलबजावणी बाकी आहे. शिक्षण आणि जागरूकता LGBTQ+ व्यक्तींनी केलेल्या संघर्षांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि जनता आणि धोरणकर्त्यांना संवेदनशील बनवणे ही समर्थना मधील एक आवश्यक बाब आहे. हार्पिक आणि न्यूज18 चे मिशन स्वच्छता और पानी सारखे उपक्रम केवळ स्वच्छतेच्या संकल्पनेच्या पलीकडे आहेत. ही एक चळवळ आहे जी शौचालयांचे महत्त्व ओळखते, त्यांना केवळ एखाद्या कार्याची जागा म्हणून पाहत नाही तर आपल्या सर्वांसाठी सुरक्षिततेचे आणि स्वीकृतीचे बीकन म्हणून पाहते. स्वच्छ आणि सर्वसमावेशक शौचालये आम्हा सर्वांना बिनशर्त सामावून घेणार्‍या आणि सक्षम बनविणार्‍या समाजाला चालना देण्यासाठी अत्यावश्यक आहेत या दृढ विश्वासावर हे विशेष मिशन उभे केले गेले आहे. अटूट समर्पणासह, Harpic आणि News18 सक्रियपणे LGBTQ+ समुदायाचा समावेश करतात आणि त्यांचे समर्थन करतात, प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आणि तिचा स्वीकार होईल अशा ठिकाणी प्रवेशास मिळविण्यास पात्र आहे, जिथे तिचा सन्मान राखला जातो आणि तिच्या उपस्थितीचे स्वागत केले जाते असा संदेश दिला जातो. चळवळ जमिनीपासून स्वतःला तयार करते: संवादामुळे समजूतदारपणा येतो, समजूतदारपणामुळे स्वीकृती होते, स्वीकृतीमुळे समर्थन होते. रचना नवकल्पना लिंग-तटस्थ स्नानगृहे आणि ट्रान्सजेंडर टॉयलेट्स सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी आणि व्यक्तींच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वेगळे पण महत्त्वपूर्ण उद्देश पूर्ण करतात. लिंग-तटस्थ स्नानगृह लिंग ओळख किंवा अभिव्यक्तीकडे दुर्लक्ष करून कोणीही वापरण्यासाठी उपयुक्त रचना केलेले आहेत. हे केवळ नॉन-बायनरी किंवा जेंडरक्वियर म्हणून ओळखल्या जाणार्‍यांनाच सामावून घेत नाहीत तर प्रत्येकासाठी अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक वातावरण उपलब्ध करून देतात, ज्यामध्ये भिन्न लिंगांची मुले असलेली कुटुंबे किंवा भिन्न लिंगी व्यक्तीची काळजी घेणार्‍या व्यक्तींचा समावेश होतो. तथापि, हा उपाय सर्वांना उपयोगी होत नाही. ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी समुदायाचा स्वीकार करणारी स्नानगृहे तयार करताना, आपण हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की या जागा देखील सुरक्षिततेसाठी महिलांच्या गरजा प्रतिबिंबित करत आहेत. उदाहरणार्थ, 24x7 काम करणार्‍या उत्तम प्रकाश व्यवस्था असलेल्या 1000 आसनी कार्यालयीन इमारतीमधील जेंडर न्यूट्रल स्वच्छता गृह वापरण्याचा अनुभव रात्री उशिरा कमी प्रकाश असलेल्या गल्लीतील जेंडर न्यूट्रल टॉयलेटपेक्षा खूप वेगळा असेल. या जागांमध्ये सुरक्षितता, सर्वसमावेशकता आणि युजर समाधान सुनिश्चित करणे हे सर्वोपरि आहे. स्मार्ट लॉक सारखे तांत्रिक उपाय क्यूबिकल्सना सुरक्षित करू शकतात, तर पॅनिक बटणे सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क करू शकतात. शिवाय, अॅप-आधारित फीडबॅक सिस्टम समाविष्ट केल्याने वापरकर्त्यांना समस्यांचा अहवाल देणे किंवा सुधारणा सुचवणे शक्य होते. हे तंत्रज्ञान सतत सुधारणांसाठी महत्त्वाची माहिती प्रदान करताना युजरची सुरक्षितता आणि समाधान सुनिश्चित करते. एकत्र पुढे जाणे. स्वच्छ भारत मिशन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांवर भारत सरकारने (GoI) अनेक संस्थांशी सहकार्य केले आहे. काही नावे सांगायची तर, महिंद्रा ग्रुप, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि अदानी ग्रुप यांनी स्वच्छतागृहे बांधण्यासाठी योगदान दिले किंवा त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. लॅव्हेटरी केअर श्रेणीमधील भारतातील अग्रगण्य ब्रँड हार्पिकने स्वच्छ भारत मिशनशी निगडीत असलेल्या अनेक उपक्रमांवर काम केले आहे - उदाहरणार्थ, हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेजेसची स्थापना. हार्पिकने केवळ स्वच्छतेवरच नव्हे तर सर्वसमावेशकतेवर भर देणार्‍या मोहिमा आणि उपक्रमांची रचना करण्यातही पुढाकार घेतला आहे. आता आपल्याला अधिक सहभागाची गरज आहे - भारत सरकार (GoI) आणि खाजगी क्षेत्र दोन्ही. कॉर्पोरेट सहभागामुळे संसाधने आणि पोहोच वाढतात, तर भारत सरकारचा सहभाग या उपक्रमांमागे सरकारची ताकद वाढवतो. एकत्रित केल्यावर, हे मोठी ताकद तयार करतात जे बहुतेकवेळा आश्चर्यकारकपणे झटपट (आणि चिरस्थायी) परिणाम आणतात. आम्हाला आणखी मित्रांची गरज आहे. समर्थन करणे हे केवळ कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांचे काम नाही; ही एक सामूहिक जबाबदारी आहे ज्यात आपल्या सर्वांचा समावेश असणार आहे. वकिली सर्व आकार आणि प्रकरांमध्ये येते - यात निषेध मोर्चामध्ये सामील होण्याची आवश्यकता नाही, परंतु जर तुम्हाला ते करायचे असेल तर ते सुद्धा केले जाऊ शकते. यात समर्थनाचा मोठा गाजावाजा देखील समाविष्ट करण्याची आवश्यकता नाही. काहीवेळा, आपण सर्वात महत्त्वाचे काम करतो आणि ते म्हणजे आपला लहान, रोजचा संवाद असतो. स्वतःला शिक्षित करून सुरुवात करा. LGBTQ+ समुदायाला भेडसावणाऱ्या समस्या समजून घ्या, विशेषत: सार्वजनिक शौचालयांच्या वापराबाबत. भिन्न लिंग ओळख आणि अभिव्यक्ती आणि प्रत्येकासमोरील अद्वितीय आव्हानांबद्दल जाणून घ्या. हार्पिक आणि न्यूज18 च्या मिशन स्वच्छता और पानी  उपक्रमामध्ये काही उत्कृष्ट कंटेंट आहे जे तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर पाहू शकता. या राष्ट्रीय संभाषणात तुम्ही भागीदार होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. येत्या काही वर्षांत, आम्ही हा कालावधी मागे वळून पाहू, आणि आपण ज्या प्रकारे एकत्र आलो आणि एकमेकांच्या गरजांसाठी उभे राहिलो त्याबद्दल आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल. एकत्रितपणे, आपण मात करू शकतो. येथे, संभाषणात सामील व्हा आणि प्रत्येकासाठी स्वच्छ आणि स्वस्थ भारत वर सूत्र हलविण्यात तुम्ही कशी मदत करू शकता याबद्दल अधिक जाणून घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या