मुंबई, 19 फेब्रुवारी : दररोज शरीरी व्यायाम केल्याने आपला मेंदू अधिक सक्रिय होऊन मेंदूचे आरोग्य सुधारते. व्यायामादरम्यान तयार होणारे इरिसिन हार्मोन मेंदूपर्यंत पोहोचते आणि न्यूरॉन्सचे आरोग्य आणि कार्य सुधारते. मात्र तुम्हाला माहित आहे का? मेंदूच्या विकासासाठी काही खास एक्सरसाइजदेखील आहेत. ज्यामुळे मेंदूची ताकद आणि कार्यक्षमता आणखी वाढते. या एक्सरसाइज तुम्ही घराच्या घरी आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया मेंदूच्या विकासासाठी कोणत्या एक्सरसाइज कराव्या. मेडिटेशन मेडिटेशन हे मेंदूच्या व्यायामापैकी एक आहे. मेडिटेशन आपल्या मेंदूसाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त असा व्यायाम आहे. मेडिटेशन केल्याने आपला मेंदूवरील ताण तणाव कमी होतो आणि त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. त्याचबरोबर मेंदू शांत होतो आणि सारासार विचार करणे सोपे जाते.
सकाळी उठताच करा ही 2 कामं; शरीर फिट राहिल कधीच आजारी पडणार नाहीलोकांमध्ये मिसळा जे लोक सभोवतालच्या लोकांमध्ये मिसळतात. मोकळं जगतात त्यांना डिमेंशिया आणि अल्झायमर होण्याचा धोका कमी असतो. यामुळे मेंदूच्या अनेक भागांना गुंतवून ठेवले जाते.
व्यायामाबरोर मैदानी खेळ खेळा अनेक ऍक्टिव्हिटीजमध्ये सामील होणे म्हणजेच एखादा मैदानी खेळ खेळणे तुमच्या मेंदूच्या विकासाठी चांगले असते. योग्य व्यायामाबरोबर खेळ खेळणे तुमच्या मेंदूसाठी फायदेशीर असते. नवीन काहीतरी शिका या मेंदूच्या व्यायामासाठी नंवनवीन गोष्टी शिकानेदेखील खूप फायद्याचे ठरते. काहीतरी नवीन शिकताना तुमचा मेंदू नव्याने कार्यरत होतो आणि त्याचा वेगळ्या गोष्टीसाठी वापर झाल्यामुळे त्याची कार्यक्षमतादेखील वाढते आणि मेंदू नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी तयार होऊ लागतो. ब्रेन बुस्टिंग गेम्स व्हेरी वेल माईंडनुसार, काहीतरी नवीन शिकण्यासोबतच मेंदूला नवनवीन गेम्समध्ये गुंतवल्यानेही फायदा होतो. असे म्हणले जाते की, मोबाईल किंवा कम्प्युटरवरील गेम खेळल्याने तुमच्या मेंदूचा व्यायाम होतो आणि यामुळे तुमची मानसिक लवचिकता वाढू शकते. Health care tips: वाढत्या वयासोबत नाश्त्यात घ्यायला हवेत हे हेल्दी फूड्स, नेहमी राहाल Powerfu (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)