मुंबई, 23 जुलै : धावपळीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि योग्य आहाराकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर आजार (Disease) होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयातच डायबेटीस, हृदयविकार होत असल्याचं दिसून येत आहे. अशा परिस्थितीत फिटनेस (Fitness) आणि योग्य आहार (Diet) या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. काही जण फिटनेससाठी व्यायाम करतात; मात्र आहाराकडे पुरेसं लक्ष दिलं जातंच असं नाही. उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. तसंच तो योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात घेणं आवश्यक आहे. सकाळी नाश्ता (Breakfast) भरपूर प्रमाणात करावा आणि तो आरोग्यदायी असावा, असं डॉक्टर्स आणि आरोग्यविषयक तज्ज्ञ नेहमी सांगतात. त्यामुळे सकाळी नाश्ता टाळू नये. त्यासोबत आरोग्यासाठी पूरक असलेल्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. `ओन्ली हेल्थ डॉट कॉम`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. उत्तम आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. नाश्त्यासाठी आरोग्यदायी पदार्थांवर (Healthy Food) भर द्यावा, असं तज्ज्ञ सांगतात. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही काही खास पदार्थांचा समावेश करू शकता. नाश्त्यामध्ये तु्म्ही दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त फळं, ज्यूस आणि नैसर्गिक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. नाश्त्यामध्ये ब्रेड, जाम आणि कॉर्नफ्लेक्ससारखे पदार्थ खाणं टाळावं. बाजारातले पॅकबंद पदार्थ नाश्त्यात समाविष्ट नसावेत. त्याऐवजी शिजवलेले हरभरे, फ्रूट सॅलड, दलिया, बेसन पिठापासून तयार केलेले पदार्थ, मोड आलेल्या कडधान्यांचा नाश्त्यात समावेश करावा. याशिवाय पाच असे पदार्थ आहेत, की जे नाश्त्यावेळी आवर्जून खाल्ले जातात. हे पदार्थ बनवायलादेखील सोपे असतात. या पदार्थांमुळे आरोग्य चांगलं राहतं. हे वाचा - ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स नेमका फरक काय? सर्वोत्तम ब्रेकफास्ट कोणता? या पदार्थांपैकी पहिला पदार्थ म्हणजे अंड्यांचं ऑम्लेट. अंड्यांचं ऑम्लेट (Egg Omelet) लहान मुलांना विशेष आवडतं. हा पदार्थ हेल्दीदेखील असतो. तुम्ही मुसळीचा नाश्त्यात समावेश करू शकता. मुसळीमध्ये (Musali) फायबर्स आणि प्रोटीन मुबलक असतात. यात तुम्ही फळं एकत्र करून ते खाऊ शकता. पोहे हा सर्वांचा आवडता पदार्थ होय. पोहे (Poha) खूप जड आणि आरोग्यदायी असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसंच ते पचायला हलके असतात. इडली (Idli) हाही चांगला आहार मानला जातो. इडली खाल्ल्यानं वजन वाढत नाही. उपमा (Upma) हादेखील आरोग्यदायी पदार्थ आहे. रव्यापासून बनवला जाणारा उपमा हृदय आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. उपमा चवदार लागावा यासाठी त्यात तुम्ही दही आणि सॉस मिक्स करू शकता. हे वाचा - Health care tips: वाढत्या वयासोबत नाश्त्यात घ्यायला हवेत हे हेल्दी फूड्स, नेहमी राहाल Powerful सकाळी नाश्ता करण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी नाश्ता केल्यानं स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते. बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे डायबेटीस (Diabetes), हृदयविकार (Heart Disease) आणि लठ्ठपणा (Obesity) टाळता येतो. आरोग्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यानंतर दोन तासांच्या आता नाश्ता करावा. त्यामुळे स्नायू सक्रिय होतात. तसंच मेंदू योग्य पद्धतीने काम करण्यासाठी तयार होतो. सकाळी उठल्यापासून दुपारी जेवेपर्यंत उपाशी राहणं टाळावं. तसं केल्यास जेवणात जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ले जातात. शुगर आणि फॅटयुक्त पदार्थ अनवधानाने जास्त प्रमाणात खाल्ल्यास लठ्ठपणा आणि अन्य गंभीर आजारांचा धोका वाढतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.