JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नुसती मेंदी नको; घनदाट काळ्या केसांसाठी त्यामध्ये या गोष्टींचा समावेश ठरले फायदेशीर

नुसती मेंदी नको; घनदाट काळ्या केसांसाठी त्यामध्ये या गोष्टींचा समावेश ठरले फायदेशीर

जर तुम्ही मेंदीमध्ये काही विशेष गोष्टी मिसळल्या तर केस थोडे जास्त काळ काळे राहतील आणि त्यांना नैसर्गिक आरोग्यही मिळेल. केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी मेंदीमध्ये काय मिसळले जाऊ शकते याबाबत आपण जाणून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : पांढरे केस गडद काळे करण्यासाठी लोक मेंदी वापरतात. परंतु, मेंदीचा रंग केसांमधून पटकन फिकट होतो आणि पांढरे केस लवकर दिसू लागतात, असे अनेकांचे म्हणणे असते. पण, जर तुम्ही मेंदीमध्ये काही विशेष गोष्टी मिसळल्या तर केस थोडे जास्त काळ काळे राहतील आणि त्यांना नैसर्गिक आरोग्यही मिळेल. केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी मेंदीमध्ये काय मिसळले जाऊ शकते याबाबत आपण जाणून घेऊया. नैसर्गिक काळ्या केसांसाठी मेंदीमध्ये कॉफी - जर तुम्हाला केसांना मेंदी लावून काळा चमकदार रंग मिळवायचा असेल तर तुम्ही मेंदीमध्ये कॉफी पावडर मिसळू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा कॉफी पावडर एक कप पाण्यात उकळा. पाणी काढून थंड करा आणि 4-5 टेबलस्पून मेंदी पावडर मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही मेंदी केसांमध्ये 3 ते 4 तास लावून ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा. असे आठवड्यातून दोनदा करावे. हे वाचा -  Rakesh Jhunjhunwala यांनी या शेअर्समधून कमावले 310 कोटी रुपये, तुम्ही गुंतवणूक केली आहे का? केस काळे करण्यासाठी मेंदीमध्ये केळी मिसळा - जर तुम्ही अशा प्रकारे मेंदी लावली तर केस दाट होण्याबरोबरच काळेही होतील. यासाठी 2 चमचे मेंदी पावडर थोड्या पाण्यात मिसळून रात्रभर राहू द्या. सकाळी एक पिकलेले केळे घेऊन त्यात मेंदी मिसळून हेअर पॅक बनवा. यानंतर, केस सौम्य शॅम्पूने धुवा आणि 10 मिनिटांसाठी हे हेअर पॅक लावा आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हे केले तरी पुरेसे आहे. हे वाचा -  Navratri 2021:साडीने नुसरतच्या सौंदर्यात टाकली भर; अभिनेत्रीने खास अंदाजात दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा मेंदी लावण्याची योग्य पद्धत - केस काळे करत असताना अस्वच्छ केसांवर मेंदी कधीही लावू नये. मेंदी लावण्याच्या एक दिवस आधी केस धुवावेत. दुसऱ्या दिवशी मेंदी लावा आणि शैम्पूशिवाय स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर केसांना कोणतेही तेल लावा. दुसऱ्या दिवशी पुन्हा केस धुवा. यामुळे केसांवरील काळा रंग जास्त काळ टिकेल आणि केस कोरडे होणार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या