JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बायनरी पलीकडे: लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधांद्वारे लिंग विषयक मानदंड पुनर्परिभाषित करणे

बायनरी पलीकडे: लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधांद्वारे लिंग विषयक मानदंड पुनर्परिभाषित करणे

सार्वजनिक आणि सामुदायिक जागांवर जेंडर-न्यूट्रल शौचालये तयार करणे हे बदल घडवून आणण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.

जाहिरात

बायनरी पलीकडे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

“आत्म-शोधाच्या प्रवासात, जेव्हा आपण बदल करण्याची गरज न पडता आपले खरे स्वत्व स्वीकारतो, तेव्हा एक सखोल परिवर्तन घडते.” जे. कृष्णमूर्ती, प्रख्यात भारतीय तत्त्ववेत्ते यांचे हे शक्तिशाली शब्द, प्रामाणिकपणा आत्मसात करून आणि विविध मानवी अनुभवांचा आदर करण्यासाठी मनापासून होकार देते. अनेकवेळा  कठोर आणि जाचक लिंग नियमांचे ओझे असलेल्या जगात, असंख्य व्यक्तींना त्यांचे खरे स्वत्व व्यक्त करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, भेदभाव आणि हिंसा देखील सहन करावी लागते कारण त्यांच्या वेगळेपणाच्या बाबतीत गैरसमज करून घेतला जातो. या नियमांना आव्हान देण्यासाठी आणि सर्वसमावेशकता जोपासण्यासाठी आपल्याला अधिक सुसंवाद, अधिक समज आणि लिंग विविधता सामान्य करण्यासाठी अधिक ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक आणि सामाजिक आस्थापनांमध्ये लिंग-तटस्थ स्वच्छतागृहांची तरतूद हे या दिशेने एक शक्तिशाली आणि परिवर्तनकारी पाऊल आहे. ही स्वच्छतागृहे प्रत्येकाला वापरण्यायोग्य आहे याची खात्री करून, त्यांचे जैविक लिंग, त्यांची लिंग अभिव्यक्ति किंवा त्यांची उंची, त्यांचे वजन, त्यांच्या त्वचेचा रंग, त्यांचे राजकीय विचार किंवा इतर कशाचाही विचार न करता लिंगाची बायरनी रचना खंडित करतात. असे केल्याने, ते अशा जागा तयार करतात जिथे सर्व स्वागतार्ह आहेत आणि आपल्या मधील ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी आणि इंटरसेक्स व्यक्तींसाठी ते सुरक्षितता आणि त्यांचा स्वीकार होईल अशी बेटे तयार करतात. लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधांची गरज का आहे? लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधा व्यक्ती आणि समाज दोघांनाही अनेक लाभदायी असतात: सन्मान आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे: छळ, हिंसा किंवा अपमान होणार नाही अशा सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृह सुविधा वापरण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे हे मान्य करून, लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधा मानवी हक्कांना पाठबळ देतात. ती हे समजून घेतात की लिंग हे बायनरी संकल्पनेच्या पलीकडे विस्तारलेले आहे, ज्यामध्ये आदर आणि मान्यता मिळण्यास पात्र असलेल्या विविध ओळख आणि अभिव्यक्तींचा समावेश आहे. समावेश आणि विविधता यांना चालना देणे: लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधा असे वातावरण तयार करतात जिथे विविध लिंग आणि अभिव्यक्ति असलेल्या व्यक्ती सुसंवादीपणे आणि सहजतेने एकत्र राहतात. ती एक सशक्त संदेश प्रसारित करतात की सर्व व्यक्ती, त्यांची लिंग ओळख किंवा अभिव्यक्ती विचारात न घेता, सार्वजनिक आणि सामाजिक आस्थापनांनमध्ये केवळ स्वागतार्हच नाहीत तर त्यांचे मूल्यही आहे. कलंक आणि भेदभाव कमी करणे: ही स्वच्छतागृहे लिंग विविधतेचे सामान्यीकरण करून विशिष्ट लिंगांशी संबंधित रूढी आणि पूर्वग्रह आणि त्यांच्या संबंधित भूमिका, वागणूक आणि अपेक्षा यांना आव्हान देतात. ते ट्रान्सजेंडर आणि नॉन बायनरी व्यक्तींना भेडसावणाऱ्या कलंक आणि भेदभावाशी दोन हात करतात आणि ‘पुरुष’ किंवा ‘महिला’ स्वच्छतागृह यापैकी एक निवडण्याची अडचण दूर करतात, जेथे ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स आणि नॉन-बायनरी व्यक्ती दुर्लक्षित केल्या जातात. आरोग्य आणि स्वास्थ्य सुधारणे: ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स आणि नॉन-बायनरी व्यक्तींसाठी, लिंग निश्चित स्वच्छतागृहामध्ये जाण्याचा अनुभव नेहमीच तणावाने भरलेला असतो - त्यांनी कोणते स्वच्छतागृह वापरायचे ते निवडले तरीही, त्यांच्या तेथील उपस्थितीला आव्हान दिले जाण्याची, तेथे त्यांचा अपमान होण्याची, त्यांना बाहेर काढले जाण्याची किंवा शा‍ब्दिक आणि/किंवा शारीरिक हल्ला होण्याची शक्यता नेहमीच असते. यामुळे बरेच लोक ‘धरून’ ठेवतात, आणि स्वच्छतागृहामध्ये अजिबातच जात नाहीत, ज्यामुळे मूत्रमार्गात संक्रमण, मूत्रपिंड समस्या, बद्धकोष्ठता आणि निर्जलीकरणा सारख्या अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. लिंग तटस्थ स्वच्छतागृहे या सगळ्यापासून बचाव करतात. कार्यक्षमता आणि सुविधा वाढवणे: सार्वजनिक आणि सामाजिक आस्थापनांनमध्ये, लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधा त्यांच्या वापराची कार्यक्षमता आणि सोय यात सुधारणा करतात. प्रतीक्षा वेळ कमी करून, विशेषत: ज्या महिलांना केवळ महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांच्या बाहेर लांब रांगांना सामोरे जावे लागते त्यांच्यासाठी, या सुविधा अधिक सुविधापूर्ण अनुभव देतात. या शिवाय, लिंगावर आधारित स्वतंत्र प्रसाधनगृहांची गरज दूर करून, लिंग-तटस्थ सुविधा जागा, आर्थिक संसाधने आणि इतर मौल्यवान मालमत्तेची बचत देखील करतात. कोणती आव्हाने आणि अडथळे भारतात लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधांचा अवलंब करण्यात अडथळा आणतात? लैंगिक-तटस्थ स्वच्छतागृह सुविधांचे अनेकविध फायदे असूनही, असंख्य आव्हाने आणि अडथळे भारतात त्यांचा व्यापक अवलंब करण्यामध्ये आणि अंमलबजावणीमध्ये अडथळा आणतात. यातील काही अडथळे पुढील प्रमाणे आहेत: जागरूकता आणि आकलनाचा अभाव: भारतातील अनेक व्यक्ती लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधा, तसेच ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी व्यक्तींच्या गरजा आणि हक्कांबद्दल अनभिज्ञ आहेत किंवा त्यांना त्या समजत नाहीत. विविध लिंग किंवा अभिमुखता असलेल्या व्यक्तींसोबत स्वच्छतागृहे शेअर करण्याबाबत गैरसमज आणि आशंका आहेत. कायदेशीर मान्यता आणि संरक्षणाचा अभाव: भारतामध्ये एका व्यापक कायद्याचा अभाव आहे जो ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी व्यक्तींच्या हक्कांना जाणतो आणि त्यांचे संरक्षण करतो, ज्यात स्वच्छतागृहा सारख्या सार्वजनिक सेवांचा वापर करण्याच्या अधिकारांचा समावेश आहे. संसदेने पारित केलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, 2019, अपुरा, भेदभाव करणारा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणारा असल्याची टीका कार्यकर्त्यांकडून झाली आहे. सामाजिक सहकार्याचा अभाव: भारतातील अनेक राजकारणी, धोरणकर्ते, प्रशासक, सेवा प्रदाते आणि नागरी समाज संस्था सार्वजनिक आणि सामाजिक आस्थापनांनमध्ये लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधांचा प्रचार किंवा अंमलबजावणी करण्यासाठी मर्यादित राजकीय इच्छा किंवा सामाजिक सहकारी प्रदर्शित करतात. लिंग भिन्नतेच्या कारणास्तव रूढिवादी, धार्मिक गट किंवा समाजातील उदासीनता किंवा शत्रुत्वामुळे होणारा विरोध किंवा प्रतिकार ही आव्हाने आणखी वाढवतात. ही आव्हाने आणि अडथळे आपण कसे पार करू शकतो? अनेक आव्हाने आणि अडथळे असूनही, भारतात लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधा प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यवहार्य उपाय अस्तित्वात आहेत. या अडथळ्यांवर मात करण्यासाठीची मुख्य धोरणे पुढील आहेत: जागरूकता आणि समज वाढवणे: सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, रेडिओ, टेलिव्हिजन, पोस्टर्स, फ्लायर्स, कार्यशाळा, परिसंवाद आणि मोहिमा यासारख्या विविध मीडिया प्लॅटफॉर्म आणि चॅनेलद्वारे, आपण माहिती प्रसारित करू शकतो आणि विविध भागधारकांना आणि समाजातील घटकांना लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधांबद्दल आणि ट्रान्सजेंडर आणि नॉन बायनरी व्यक्तींच्या गरजा आणि अधिकार याबद्दल शिक्षित करू शकतो. कायदेशीर मान्यता आणि संरक्षणासाठी समर्थन करणे: सर्वसमावेशक कायदेशीर मान्यता आणि ट्रान्सजेंडर आणि नॉन बायनरी व्यक्तींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी समर्थन करून, स्वच्छते सारख्या सार्वजनिक सेवा वापरण्याच्या त्यांच्या अधिकारांसह, आपण सरकारी संस्था, न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि इतर प्राधिकरणांशी संलग्न राहू शकतो. सर्वसमावेशक कायदे, धोरणे, मार्गदर्शक तत्त्वे आणि लिंग विविधता आणि अभिव्यक्ति यांचा आदर आणि सन्मान करणार्‍या नियमांची अंमलबजावणी किंवा सुधारणा करण्यासाठी लॉबिंग करणे अत्यावश्यक आहे. सामाजिक समर्थन तयार करणे: सार्वजनिक आणि सामाजिक आस्थापनांनमध्ये लिंग-तटस्थ स्वच्छतागृह सुविधांचा प्रचार आणि अंमलबजावणी करण्यासाठी, राजकारणी, धोरणकर्ते, प्रशासक, सेवा प्रदाते आणि नागरी समाज संस्था यांच्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. या भागधारकांना समर्थन देण्यास प्रवृत्त करून आणि याचिका, निषेध, रॅली आणि मोर्चे यांच्याद्वारे जनमत एकत्रित करून, आपण राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक समर्थन विकसित करू शकतो. पायाभूत सुविधा आणि संसाधने यात सुधारणा करणे: सार्वजनिक आणि सामाजिक आस्थापनांमध्ये लिंग-तटस्थ स्वच्छतागृहांच्या सुविधांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि संसाधने वाढवण्यासाठी सरकार, खाजगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि इतर भागधारकांचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. प्रवेशयोग्य, सुरक्षित, स्वच्छतापूर्ण आणि आरामदायी प्रसाधनगृहांची रचना, बांधकाम, नूतनीकरण, देखभाल आणि व्यवस्थापन करून, ते सर्व वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करतात याची आपण खात्री कली पाहिजे. पाण्याची उत्तम व्यवस्था, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स, कचरापेटी, कुलूप आणि दिवे यासारख्या आवश्यक वैशिष्ट्यांसह या सुविधा सुसज्ज करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यशस्वी उपक्रम आणि सर्वोत्तम पद्धतींची काही उदाहरणे कोणती आहेत? जगभरातील आणि भारतातील प्रेरणादायी उपक्रम आणि सर्वोत्तम पद्धती यांची उत्तम उदाहरणे, प्रेरणा देण्याचे काम करतात. काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत: स्वच्छ भारत मिशन (SBM): भारत सरकारचा हा प्रमुख कार्यक्रम सार्वत्रिक स्वच्छतेसाठी प्रयत्नशील आहे. सार्वजनिक आणि सामाजिक सुविधांसह ग्रामीण आणि शहरी भागात स्वच्छतागृहे बांधून, SBM ने लक्षणीय प्रगती केली आहे. आज प्रत्येक भारतीयाला स्वच्छतागृह उपलब्ध आहे. याशिवाय, वर्तन बदल संवाद आणि सामाजिक एकत्रीकरण मोहिमा स्वच्छतागृहांचा वापर आणि सुरक्षित स्वच्छता पद्धतींना चालना देत आहेत. शैक्षणिक संस्था: बदलाची बीजे शैक्षणिक संस्थांमध्ये पेरली जात आहेत, जिथे उत्साही विद्यार्थी गट लिंग-तटस्थ स्वच्छतागृहांचे समर्थन करीत आहेत. IIT मुंबई आणि मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हे त्यांच्या संबंधित LGBTQ+ विद्यार्थी समर्थन गट, साथी आणि क्विअर कलेक्टिव्ह यांच्या नेतृत्वाखाली, 2017 मध्ये लिंग-तटस्थ स्वच्छतागृहे स्थापित करत या चळवळीत अग्रणी होते. ही उत्कृष्ट उदाहरणे एकता आणि सहयोगाच्या परिवर्तनक्षम शक्तीवर भर देतात. . इतर भारतीय विद्यापीठे देखील त्यांच्या कॅम्पसमध्ये लिंग-तटस्थ जागा आणि निवास व्यवस्था तयार करीत आहेत. आयआयटी दिल्लीकडे आता 14 लिंग-तटस्थ स्वच्छतागृहे आहेत, जे त्यांच्या सर्वसमावेशकतेच्या अटूट वचनबद्धतेचा पुरावा आहे. याशिवाय, आसाममधील तेजपूर विद्यापीठ आणि आंध्र प्रदेशातील नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (NALSAR) यांनीही लिंग-तटस्थ स्वच्छतागृहे स्वीकारली आहेत. लिंग-तटस्थ कार्यालये: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच आपल्या आवारात नऊ लिंग-तटस्थ स्वच्छतागृहे उभारली आहेत. दिल्लीमध्ये, सरकारने सर्व विभाग, कार्यालये, जिल्हा प्राधिकरणे, महानगरपालिका, सरकारी कंपन्या आणि दिल्ली पोलिस यांच्याकडे ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी स्वतंत्र आणि विशेष स्वच्छतागृहे असणे अनिवार्य करून सर्वसमावेशकतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवी दिल्ली म्युनिसिपल कौन्सिल (NDMC) ने 2021-22 च्या वार्षिक बजेटमध्ये केवळ ट्रान्सजेंडर समाजासाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या तरतुदीसाठी निधीची तरतूद केली आहे. हा निर्णय ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स आणि नॉन-बायनरी समाजाच्या विशिष्ट गरजा जाणण्याच्या आणि त्यांना संबोधित करण्याच्या दिशेने प्रगती दर्शवतो. हार्पिक मिशन स्वच्छता और पानी (MSP): LGBTQ+ व्यक्तींनी केलेल्या संघर्षांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जनता आणि धोरणकर्त्यांना संवेदनशील करणे आवश्यक आहे. हार्पिक आणि न्यूज18 चे मिशन स्वच्छता और पानी सारखे उपक्रम केवळ स्वच्छतेच्या संकल्पनेच्या पुढे जाणारे आहेत. मिशन स्वच्छता और पानी ही एक चळवळ आहे जी स्वच्छतागृहांचे गहन महत्त्व ओळखते, त्यांना केवळ कार्यभाग साधण्याची जागा म्हणून पाहत नाही तर आपल्या सर्वांसाठी सुरक्षिततेचे आणि स्वीकृतीचे बीकन म्हणून पाहते. स्वच्छ आणि सर्वसमावेशक स्वच्छतागृहे आपल्या सर्वांना बिनशर्त सामावून घेणार्‍या आणि सक्षम करणार्‍या समाजाला चालना देण्यासाठी अत्यावश्यक आहेत या दृढ विश्वासावर हे विशेष मिशन उभे राहिले आहे. अटूट समर्पणाने, हार्पिक आणि न्यूज18 सक्रियपणे LGBTQ+ समाजाचे समर्थन करतात, प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आणि स्वीकारार्ह ठिकाणी प्रवेशास पात्र आहे, ज्या ठिकाणी त्यांचा सन्मान राखला जातो आणि त्यांच्या उपस्थितीचे स्वागत केले जाते. चळवळ या आधारावर स्वतःला तयार करते की: संवादामुळे समजूतदारपणा येतो, समजूतदारपणामुळे स्वीकृती होते आणि स्वीकृतीमुळे समर्थन मिळते. निष्कर्ष लिंग-तटस्थ स्वच्छतागृहे सुविधा मर्यादा आणणारे लिंग विषयक नियम मोडून काढण्यात आणि सर्व लिंग आणि अभिमुखतेच्या व्यक्तींसाठी सर्वसमावेशक जागा उभी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सन्मान आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देऊन, समावेश आणि विविधता वाढवून, कलंक आणि भेदभाव कमी करून, आरोग्य आणि कल्याण सुधारून आणि कार्यक्षमता आणि सुविधा वाढवून, या सुविधा आपल्याला अधिक न्याय्य आणि आदरयुक्त समाज तयार करण्यात मदत करतात. या राष्ट्रीय संवादात आपण कसा सहभाग घेऊ शकता हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत येथे सामील व्हा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या