JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care : खाण्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर असते विड्याचे पान, वाचा फायदे

Skin Care : खाण्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर असते विड्याचे पान, वाचा फायदे

विड्याची पाने (Betel Leaves) आपल्या चेहऱ्यावरील वृद्धत्वाची प्रभाव जसे की सुरकुत्या यांना कमी करते. या पानामध्ये अँटीएजिंग गुणधर्म (Anti-Aging Properties) असतो. त्याचबरोबर यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्मदेखील असतात. त्यामुळे ही पाने मुरुमांमुळे होणारी जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून : सुंदर दिसणं प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र बदलत्या हवामानामुळे आणि आपल्या आहारातील अनियमिततेमुळे आपल्या त्वचेवर याचा परिणाम होतो. त्वचेवर पुरळ, डाग आणि पिम्पल्स येतात. यामुळे त्वचा निस्तेज दिसते. मग आपण अनेक घरगुती उपाय करतो. अश्याच एक घरगुती उपायांबद्दल (Skin Care Tips) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही विड्याचे पान (Betel Leaves) तर खाल्लेच असेल मात्र हे पान केवळ खाण्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही तितकेच फायद्याचे आहे (Betel Leaves Skin Benefits). ही पाने आपल्या चेहऱ्यावरील वृद्धत्वाची प्रभाव जसे की सुरकुत्या यांना कमी करते. या पानामध्ये अँटीएजिंग गुणधर्म (Anti-Aging) असतो. त्याचबरोबर यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्मदेखील असतात. त्यामुळे ही पाने मुरुमांमुळे होणारी जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या पानांचा रस लावल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो. यासाठी काही सुपारीची पाने उकळा, हे पाणी कोमट झाल्यावर तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाका किंवा थेट खाज आणि सूजलेल्या जागेवर लावा. यामुळे तुम्हाला लवकर अराम मिळेल.

Photo Gallery : गेल्या जन्माच्या चांगल्या कर्मांमुळेच वर्तमानात मिळतात ‘या’ गोष्टी, काय सांगते आर्य चाणक्य नीती?

चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples) येणे ही खूप सामान्य समस्या आहे. साधारणपणे पिंपल्स बॅक्टेरियामुळे येतात. विड्याच्या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी प्रभाव (Antibacterial) असतो. त्यामुळे हे पिंपल्स करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. पिंपल्स घालवण्यासाठी ही पाने घ्या आणि त्यांची पेस्ट बनवा. नंतर त्यात चिमूटभर हळद टाकून चेहऱ्याला लावा. सुकल्यावर चेहरा धुवा आणि मऊ टॉवेलने हळू पुसा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर त्वचेवरील काळे डागदेखील कमी होतील.

World Sickle Cell Day 2022: लक्षणे अगदी कॉमन असलेला सिकल सेल आजार वेळीच ओळखा

संबंधित बातम्या

Stylecraze मध्ये दिलेल्या माहितीनुसार, विड्याच्या पानांमध्ये दाहक-विरोधी (Anti-Inflammatory) आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. जे चेहऱ्यावरील काळे डाग हलके करण्यास मदत करतात. यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास तसेच ती चमकदार आणि डागरहित होण्यास मदत होते. यासाठी मूठभर सुपारीची पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. त्वचेवर काही मिनिटे ते तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकदार होते आणि डाग हळूहळू कमी होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या