JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Weight Loss : पाणी प्यायल्याने वजन कमी होत? जाणून घ्या पाणी पिण्याची वेळ आणि पद्धत

Weight Loss : पाणी प्यायल्याने वजन कमी होत? जाणून घ्या पाणी पिण्याची वेळ आणि पद्धत

सध्या वजन वाढणे, लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. व्यायाम, संतुलित आहार तसेच योग्यवेळी आणि प्रमाणात पाणी प्यायल्याने आपण वजन कमी करू शकतो.

जाहिरात

पाणी प्यायल्याने वजन कमी होत? जाणून घ्या पाणी पिण्याची वेळ आणि पद्धत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सध्या वजन वाढणे, लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. धावपळीची जीवनशैली, फास्टफूडचे सेवन इत्यादी घटक यासाठी कारणीभूत ठरतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक काहीही करण्यासाठी तयार असतात. परंतु तोंडावर ताबा ठेवता येत नसल्याने त्यांचे वजन कमी करण्याचे सर्व प्रयन्त फेल होतात. परंतु व्यायाम, संतुलित आहार तसेच योग्यवेळी आणि प्रमाणात पाणी प्यायल्याने आपण वजन कमी करू शकतो. तेव्हा वजन कमी करण्यासाठी कोणत्या पद्धतीने पाण्याचे सेवन करावे हे जाणून घेऊयात. मानवी शरीर हे 70 टक्के पाण्याने बनलेले असते. शरीराची क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी पाणी पिणे खूप आवश्यक आहे. तज्ञांच्या सांगण्यानुसार दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे. तेव्हा वजन कमी करण्यासाठी कोणत्या पद्धतीने पाण्याचे सेवन करावे हे जाणून घेऊयात.

गरम पाण्याचे सेवन करा : दररोज सकाळी उठल्यावर गरम पाणी पिल्यामुळे आपले मेटाबॉलिज्म आणि पचनक्रिया नीट रहाते. गरम पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त वाढलेली चरबी कमी होते. परंतु व्यायाम केल्यानंतर लगेचच गरम पाणी पिऊ नये, त्याऐवजी थंड किंवा साधं पाणी प्यावे. भूक कमी लागते : गरम पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. त्यामुळे भूक कमी लागल्याने तुम्ही मोजकेच आणि आवश्यक तितकेच जेवण जेवता आणि परिणामी तुमचे वजन कमी होते. Coconut water in diabetes : डायबिटीज रुग्णांनी नारळ पाणी प्यावं की नाही? कसा होतो आरोग्यावर परिणाम गॅस आणि अपचनाची समस्या कमी होते : जेवणापूर्वी अर्धातास अगोदर आणि जेवणानंतर अर्धातासाने गरम पाणी प्यावे. गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, पचनक्रियेतील अडथळा आणि गॅसची समस्या दूर होते. तसेच सकाळी चहा कॉफी अथवा काहीही खाण्याच्या अगोदर गरम पाणी प्यावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या