नवी दिल्ली, 10 मार्च : मुंबईतील अनेक ठिकाणं स्ट्रिट शॉपिंगसाठी पॉप्युलर आहेत. वेस्टर्न वेयर, फूट वेयर, ज्वेलरी, लेदर मार्केट, साडी मार्केट अशा विविध गोष्टींसाठी काही खास ठिकाणं प्रसिद्ध आहेत. अशात तुम्ही खरेदीचा विचार करत असाल, तर तुम्हाला कोणती गोष्ट घेण्यासाठी कुठे जावं लागेल हे माहित असणं गरजेचं आहे. मुंबईतील या स्ट्रिट मार्केटमध्ये (Street Shopping Near Me In Mumbai) तुलनेने कमी दरात आणि मोठी व्हेरॅयिटी पाहायला मिळते. लिंकिंग रोड (Linking Road) - वांद्रे इथे अनेक प्रकारच्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. विकेंडच्या दिवशी मोठी गर्दी असल्याने तुम्ही मधल्या दिवसांत इथे शॉपिंगचा आनंद घेऊ शकता. सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत इथे खरेदी करता येईल. लिंकिंग रोड इंडियन स्टाइल चप्पल आणि बॅग्ससाठी पॉप्युलर आहे. हिल रोड (Hill Road) - कमी किंमतीत तसंच विविध प्रकारचे कपडे इथे खरेदी करता येतील. 2 किलोमीटरच्या अंतरावर लहान मुलं, महिला, पुरुष अशा सर्वांसाठीच शॉपिंग करता येईल. इथे बार्गेनिंग करणं अतिशय गरजेचं ठरतं. लेटेस्ट ज्वेलरीसाठी वांद्र्यातील हे हिल रोड पॉप्युलर आहे.
कुलाबा कॉजवे (Colaba Causeway) - कुलाबा कॉजवे इथे स्ट्रिट शॉपिंगसह हाय-एंड ब्रँड्सही उपलब्ध आहेत. मुंबईतील सर्वात बेस्ट शॉपिंगसाठी कुलाबा कॉजवे पॉप्लुलर आहे. लेदर बेल्ट, ज्वेलरीसाठी हे प्रसिद्ध असून इथे बार्गेनिंग केल्यास चांगल्या किमतीत तुम्हाला हवी ती वस्तू घेता येईल.
लोखंडवाला मार्केट (Lokhandwala Market) - बजेट फ्रेंडली प्राइज, चांगल्या क्वॉलिटसह अनेक गोष्टी इथे मिळतात. फूटवेयर, हाउसहोल्ड, मोबाइल फोन अॅक्सेसरिज, मेन्स क्लोथिंग कलेक्शनची मोठी रेंज मिळते. अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला मार्केट असून दुपारी 12 ते रात्री 10.30 पर्यंत सुरू असतं. गांधी मार्केट (Gandhi Market) - किंग्ज सर्कल (Kings Circle) इथे गांधी मार्केट असून ट्रॅडिशनल कपड्यांची मोठी रेंज इथे मिळते. सायन आणि माटुंगा इथून किंग्ज सर्कलला पोहोचता येईल. एम्ब्रोडरी इंडियन लेहेंगा आणि सूट्सचं जबरदस्त कलेक्शन इथे पाहायला मिळेल. तसंच विविध प्रकारचं फ्रॅब्रिकही इथे घेता येईल. तसंच ज्वेलरी, फूटवेयरही इथे चांगल्या रेंजमध्ये खरेदी करता येतील.
नटराज मार्केट (Natraj Market) - लग्नसमारंभात ट्रॅडिशन-इंडियन क्लोथिंगसाठी मालाड पश्चिम येथील नटराज मार्केट पॉप्युलर आहे. अतिशय कमी जागेत स्ट्रिट शॉपिंग तसंच एसी शोरुमही आहेत. अनारकली सूट, साडी, लेहेंगा इथे बजेट फ्रेंडली किंमतीत उपलब्ध होतात. कपड्यांशिवाय फूटवेयर, ज्वेलरी, बॅग्सचीही मोठी रेंज इथे मिळेल. स्ट्रिट शॉपिंग करताना महत्त्वाची बाब म्हणजे बार्गेनिंग करणं आहे. कोणतीही वस्तू दुकानदाराने सांगितलेल्या किंमतीत घेऊ नका. कपडे घेताना पूर्णपणे तपासून, चेक करुनच घ्या. तसंच कपडे, ज्वेलरी, फूटवेयर इथे खरेदी करू शकता. परंतु कॉस्मेटिक शक्यतो खरेदी करू नये.