जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Dmart in Thane: ठाण्यात डीमार्ट शोधताय? या भागात आहेत प्रशस्त डीमार्ट

Dmart in Thane: ठाण्यात डीमार्ट शोधताय? या भागात आहेत प्रशस्त डीमार्ट

Dmart in Thane: ठाण्यात डीमार्ट शोधताय? या भागात आहेत प्रशस्त डीमार्ट

ठाणे शहरातील अनेक भागात Dmart आहे. पाहा ठाणे शहरात कोणत्या भागात आहेत कुठे आहे डीमार्ट.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 मार्च : ग्लोसरी शॉपिंगसाठी सध्या अनेक शहरांत डीमार्ट (Dmart) अतिशय पॉप्युलर आहे. एकाच ठिकाणी अनेक गोष्टी मिळत असल्याने तसंच डिस्काउंट-ऑफर्समुळे अनेकांचा ग्लोसरी किंवा इतर खरेदीसाठी डीमार्टकडे मोठा कल आहे. अशात तुमच्या शहरात डीमार्ट कुठे आहे हे तुम्ही सहज शोधू शकता. ठाणे शहरातील अनेक भागात Dmart आहे. ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेड, माजीवाडा अशा भागात प्रशस्त डीमार्ट आहेत. पाहा ठाणे शहरात कोणत्या भागात आहेत कुठे आहे डीमार्ट. घोडबंदर रोड (Ghodbunder) - ठाण्यातील घोडबंदर रोड इथे डीमार्ट असून रात्री 11 वाजेपर्यंत हे उपलब्ध असतं. पत्ता - घोडबंदर रोड, मुछाला कॉलेज, पार्कवुड्स, ठाणे-पश्चिम नौपाडा रोड (Naupada) - नौपाडा येथील हे डीमार्ट रात्री 9 वाजता बंद होतं. पत्ता - महात्मा गांधी रोड, कोपरी पूल, भास्कर कॉलनी, ठाणे - पश्चिम मोबाइल - 072088 52078

हे वाचा -  Best Non-veg Restaurant Pune:कोथरुडमधील या 5 हॉटेल्समध्ये मिळेल जबरदस्त चिकन-मटण

कोलशेत (Kolshet) - रात्री 10 वाजेपर्यंत कोलशेत येथील डीमार्ट सर्विस सुरू असते. पत्ता - कैलास नगर, कोलशेत रोड, ठाणे - पश्चिम मानपाडा (Manpada) - पत्ता - गार्डन इस्टेड, A1 कोठारी कंपाउंड, मानपाडा ठाणे - पश्चिम वसंत-विहार (Vasant Vihar) - No. 2 पोखरन रोड, तुलसीधाम, वसंत विहार, ठाणे - पश्चिम Dmart Ready App -  डीमार्ट सामानाची घरपोच सुविधाही देतं. घरपोच सामान मागवण्यासाठी Dmart Ready App डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर मोबाइल नंबर टाकावा लागेल. रजिस्टर्ड मोबाइल नंबर OTP पाठवला जातो. त्यानंतर आपल्या भागाचा पीन कोड टाकून तुमच्या भागात डीमार्टची घरपोच डिलीव्हरी सेवा आहे की नाही हे तपासता येतं. तसंच घरपोच सुविधा असल्यास ज्यावेळेत सामान मागवायचं आहे ते वेळेचा टाइम स्लॉट टाकून घरपोच डिलीव्हरी मिळवता येते. सकाळी 7 वाजल्यापासून ही सुविधा सुरू होते. परंतु अद्यापही सर्वच डीमार्ट ही सुविधा उपलब्ध नाही. या सुविधेसाठी मिनिमम चार्ज द्यावा लागतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात