जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Libraries: वाचनप्रेमींची हक्काची जागा! मुंबईतील या ठिकाणी मिळतील हवी ती पुस्तकं

Libraries: वाचनप्रेमींची हक्काची जागा! मुंबईतील या ठिकाणी मिळतील हवी ती पुस्तकं

Libraries: वाचनप्रेमींची हक्काची जागा! मुंबईतील या ठिकाणी मिळतील हवी ती पुस्तकं

तुम्ही एखादं महत्त्वाचं पुस्तक शोधत असाल तर मुंबईतील काही लायब्ररीमध्ये (Best Libraries Near Me In Dadar, Mumbai) नक्की भेट देऊ शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 मार्च : अनेकांना वाचनाची मोठी आवड असते. कथा, कादंबरी, गोष्टीचं पुस्तकं अशा गोष्टी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी लायब्ररी (Library) अर्थात ग्रंथालय अतिशय महत्त्वाचं, फायद्याचं ठरतं. जगभरात अनेक ठिकाणी प्रसिद्ध, भव्य, लाखोंनी पुस्तक असलेल्या अनेक लायब्ररी आहेत. केवळ वाचनासाठीच नाही, तर अनेक जण अभ्यासासाठीही लायब्ररीमध्ये जातात. MPSC, UPSC सारख्या अनेक सरकारी परीक्षांसाठीची पुस्तकंही लायब्ररीमध्ये उपलब्ध असतात. काही ग्रंथालयं पुस्तकं घेण्यासाठी किंवा ग्रंथालयात बसून अभ्यास, वाचन करण्यासाठी काही शुल्क आकारतात तर काही लायब्ररी या सुविधा पूर्णपणे मोफत देतात. अशात मुंबईत तुम्ही एखादं महत्त्वाचं पुस्तक शोधत असाल तर या काही लायब्ररीमध्ये (Best Libraries Near Me In Dadar, Mumbai) नक्की भेट देऊ शकता. वसंत वाचनालय (Vasant Vachanalaya) - ही लायब्ररी रात्री 8 वाजता बंद होते. सकाळी 9 ते 11.30 आणि दुपारी 3.30 ते 8 पर्यंत सुरू असते. पत्ता - रामदास भुवन, दादासाहेब रेगे मार्ग, दादर वेस्ट, शिवाजी पार्क, मुंबई - 400028 फोन - 022 2446 8248 मराठी ग्रंथ संग्रहालय (Marathi Grantha Sangrahalaya) - दादर येथील या लायब्ररीला 4.5 स्टार देण्यात आले आहेत. रात्री 9.30 वाजेपर्यंत ही सुरू असते. पत्ता - A/3, डॉ. डी सिल्हा रोड, कबुतरखाना जवळ, दादर (पश्चिम) - 400028 फोन - 24361905

हे वाचा - 24 Hours Medical: नवी मुंबईत इथे मिळेल औषधांची फ्री होम डिलीव्हरी

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय (Mumbai Marathi Grantha Sangrahalaya) - या लायब्ररीला 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. संध्याकाळी 7.45 वाजेपर्यंत लायब्ररी सुरू असते. पत्ता - MMGS मार्ग, नायगाव, एसटी बस स्टँडजवळ, दादर (पूर्व) - 400014 फोन - 022 2413 4211 मुंबई मराठी लायब्ररी (Mumbai Marathi Library) - पत्ता - शॉप 11, 12, मंत्री चाळ, गोखले रोड, बाबासाहेब आंबेडकर नगर, दादर (पश्चिम) - 400025

हे वाचा - Dmart in Thane: ठाण्यात डीमार्ट शोधताय? या भागात आहेत प्रशस्त डीमार्ट

द पिपल्स फ्री रिडींग (The People’s Free Reading) - या लायब्ररीला 4.5 स्टार रेटिंग असून अनेकांनी या लायब्ररीबाबत चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लायब्ररी रात्री 8 वाजता बंद होते. पत्ता - J.S.S रोड, मेट्रो Inox सिनेमासमोर, धोबीतलाव, सोनापूर, मरिन लाइन्स, मुंबई - 400002 फोन - 022 2201 3050

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात