JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Success Astro Tips: न बोलता, शांतपणे मंदिरात जाऊन करा या गोष्टी; नॉनस्टॉप प्रगती होत जाईल

Success Astro Tips: न बोलता, शांतपणे मंदिरात जाऊन करा या गोष्टी; नॉनस्टॉप प्रगती होत जाईल

जाणून घेऊया बिकट परिस्थितीत आपल्याला करिअरमध्ये किंवा आयुष्यात यश मिळवायचे असेल तर कोणत्या (Good Luck Remedies) गोष्टी कराव्यात. त्यासाठी ज्योतिषशास्त्राच्या काही टिप्स जाणून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जून : अनेक लोकांना कामाचे-मेहनतीचे फळ मिळत नाही किंवा केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. असं होऊ नये म्हणून ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. याबाबत काही समजुती प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत, ज्या आजही प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया बिकट परिस्थितीत तुम्हालाही करिअरमध्ये किंवा आयुष्यात यश मिळवायचे असेल तर कोणत्या (Good Luck Remedies) गोष्टी कराव्यात. कापूस - झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर मंदिरात तांदळासोबत कापूस ठेवावा. यासोबत साखरेचे काही दाणे हातात घ्या. या वस्तू कोणत्याही मंदिरात शांतपणे घेऊन जा आणि ठेवा. असं केल्याने माणसाला त्याच्या मेहनतीचे फळ मिळू लागते. तांदूळ भरलेला कलश - तांब्याचा छोटासा कलशदेखील खूप चमत्कारिक आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे एखादा छोटासा किंवा मोठा तांब्याचा कलश घ्या, त्यात तांदूळ भरा आणि शांतपणे कुठल्यातरी मंदिरात नेऊन ठेवा. हा उपाय करताना लक्षात ठेवा की नवीन कलश वापरावा. हा उपाय केल्याने व्यक्तीचे भाग्य बदलते आणि त्याला प्रत्येक कामात यश मिळते. चांदीचा तुकडा- करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हातात चांदीचा छोटासा तुकडा घ्या. फूल आणि तांदूळ यांच्यामध्ये तो लपवा आणि घराजवळील कोणत्याही मंदिरात ठेवा. मंदिरात ठेवणे शक्य नसेल तर घरातील देव्हाऱ्यातही ठेवता येते. हे वाचा -  Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम सुपारी- सुपारी एखाद्याचे नशीब पालटवू शकते. ज्योतिषशास्त्रात सुपारी अत्यंत पवित्र मानली जाते. सुपारीचा उपयोग पूजा आणि शुभ कार्यासाठी केला जातो. यश मिळवण्यासाठीही सुपारी खूप चमत्कारिक मानली जाते. यासाठी काही तांदूळ रुमालात गुंडाळून त्यात सुपारी ठेवावी व कोणालाही न सांगता मंदिरात ठेवून द्यावी. हे वाचा -  पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार एक रुपयाचे नाणे- कोणतेही संकट टाळण्यासाठी एक रुपयाचे नाणे मंदिरात अर्पण करू शकता. यासाठी 1 रुपयाचे नाणे 1 मूठ तांदळासोबत घ्या. आता देवासमोर जावून आपल्या समस्या-त्रास सांगावे आणि एक रुपयाचे नाणे कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावे. असं घरातील देव्हाऱ्यात पण करता येतं. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या