JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नानंतरही मित्रांसाठी वेळ देणे शक्य आहे; या 5 टिप्स वापराल तर कनेक्ट राहाल

लग्नानंतरही मित्रांसाठी वेळ देणे शक्य आहे; या 5 टिप्स वापराल तर कनेक्ट राहाल

अनेकांच्या बाबतीत असे होते की, लग्न झाल्यानंतर जुने मित्र दूर जाऊ लागतात आणि हळूहळू त्यांची आणि तुमची मैत्री फक्त नावापुरतीच उरते. पण जर तुम्हाला तुमची मैत्री आयुष्यभर टिकवायची असेल तर…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 नोव्हेंबर : प्रेम हा तसा एक दुतर्फा रस्ता आहे, तो मेंटेन राखण्यासाठी सतत बांधणी करणं आवश्यक असतं. ही गोष्ट रोमँटिक नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आणि मैत्री टिकवून ठेवण्यासाठीही लागू होते. अनेकांच्या बाबतीत असे होते की, लग्न झाल्यानंतर जुने मित्र दूर जाऊ लागतात आणि हळूहळू त्यांची आणि तुमची मैत्री फक्त नावापुरतीच उरते. पण जर तुम्हाला तुमची मैत्री आयुष्यभर टिकवायची असेल, तर काही टिप्स आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही आयुष्यभर मैत्री आहे तशी ठेवू शकता. लग्नानंतर आहे तशीच मैत्री टिकवा - मित्रांसाठी वेळ काढणे - लग्नानंतर नक्कीच आपले प्राधान्यक्रम बदलू लागतात आणि कुटुंब हे आपल्यासाठी प्रथम प्राधान्य बनते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मित्रांसाठी अजिबात वेळ काढू शकत नाही. जर तुम्ही त्यांना भेटू शकत नसाल तर किमान फोनवर किंवा मेसेंजरवर एकमेकांशी नेहमी बोलत राहा. पार्टनरसाठी बाउंड्री सेट करा - जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या मित्रांबद्दल सांगितले नाही किंवा तुमचे मित्र तुमच्यासाठी किती खास आणि महत्त्वाचे आहेत याची माहिती त्यांना दिली नाही, तर पार्टनर देखील तुमच्या मित्रांमध्ये रस घेणार नाही. त्यामुळे जोडीदाराला सर्व काही सांगून त्यांच्या अपेक्षांची सीमा ठरवणे आणि मित्रांसाठीही वेळ काढणे चांगले. मित्रांनाही प्राधान्य द्या - जर तुमच्या मित्रांना वाटू लागले की, लग्नानंतर तुमच्यासाठी मैत्रीला प्राधान्य नाही, तर नक्कीच ते तुमच्यापासून दूर जातील. पण जर तुम्ही त्यांना स्पष्ट केले की, लग्नानंतरही तुम्हाला त्यांची गरज आहे आणि मैत्री हा पर्याय नसून तुमच्यासाठी ते प्राधान्य आहे, तर तुमची मैत्री आयुष्यभर टिकेल.

मित्रांसाठी खास प्लॅन - तुम्ही कॅलेंडरवर वर्षभरात मित्रांसाठी काही खास दिवस निश्चित करा आणि त्यावेळी चांगला वेळ घालवण्यासाठी खास योजना बनवता. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहात असाल, तर एक दिवस एकत्र व्हिडिओ कॉल करून सर्वजण गप्पा मारा. मित्रांशी बोलणं-भेटणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याची एकमेकांना जाणीव करून द्या. हे वाचा -  बायकोचे अधिकार मिळेना? पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार, वकील परवडेना, काय आहे Law विशेष दिवस लक्षात ठेवा - मित्रांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, त्यांच्या मुलांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी संबंधित विशेष दिवस लक्षात ठेवा किंवा स्मरणपत्रे सेट करा. त्या दिवशी तुम्ही त्यांना कॉल करून किंवा भेटवस्तू पाठवून खास अनुभव देऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या