मुंबई, 27 फेब्रुवारी: खराब वायर्स किंवा वीज उपकरणं हाताळताना विजेचा झटका (Electric shock) लागल्याची घटना तुम्ही कुणाकडून तरी ऐकली असेल किंवा अनुभवली देखील असेल. जेव्हा वीजप्रवाह आपल्या शरीरातून वाहून जमिनीत जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या शरीराला वीजेचा धक्का म्हणजे शॉक बसतो. ही गोष्ट जीवघेणीही ठरू शकते. कदाचित त्यामुळेच एखाद्या गोष्टीच्या तीव्रतेची जाणीव करून देण्यासाठी किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी ‘440 व्होल्टचा झटका’ (440 volts) हा शब्दप्रयोग आपल्याकडे रूढ झाला आहे. अगदी बॉलिवुड चित्रपटांमध्येदेखील हा शब्दप्रयोग वापरला गेला आहे. काही वर्षांपूर्वी सलमान खानचा ‘सुलतान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटातलं ‘लग गए 440 वॉल्ट छुने से तेरे…’ ये गाणं खूप हिट झालं होतं; पण एखाद्याला खरोखर 440 व्होल्टचा झटका बसल्यास काय होईल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? याशिवाय, जेव्हा लाइटचा शॉक बसल्याचा उल्लेख करण्याची वेळ येते, तेव्हा 440 व्होल्टच का म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे का? हे वाचा- घासून घासून महिलेने दातांची अक्षरशः लावली वाट; पाहून डेंटिस्टही झाले शॉक 440 व्होल्ट समजून घेण्यापूर्वी आपण व्होल्ट म्हणजे काय, याबाबत माहिती घेऊ या. व्होल्ट हे विद्युत विभवांतर (Electric Potential Conversion) आणि विद्युतवाहक बल मोजण्याचं एस. आय. पद्धतीतलं एकक (Unit) आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास कोणताही विद्युतप्रवाह पुढे नेण्याचं काम व्होल्ट करतं. विद्युतप्रवाह पुढे जाण्यासाठी व्होल्ट विद्युत्प्रवाहावर दबाव निर्माण करतो. त्यामुळे विद्युतप्रवाह वाहतो. हा दाब जितका जास्त असेल तितकी विद्युतप्रवाहाची शक्ती वाढते. व्होल्टमीटरच्या (Voltmeter) साह्यानं याचं मापन केलं जातं. इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलेसेंड्रो व्होल्टा (Italian physicist Alessandro Volta) यांच्या नावावरून या एककाला नाव देण्यात आलं आहे. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल, की घरांमध्ये फक्त सिंगल फेज (Single Phase) कनेक्शन असतं. या सिंगल फेजमध्ये 440 व्होल्टचा करंट नसतो. घरांमध्ये सिंगल फेजमधून येणारा विद्युतप्रवाह केवळ 220 व्होल्टचा असतो. या 220 व्होल्टच्या करंटवर आपल्या घरातली जवळपास सर्व उपकरणं चालतात. मोठी उपकरणं सिंगल फेजवर चालत नाहीत. मोठी उपकरणं चालण्यासाठी थ्री-फेज कनेक्शन (Three Phase Connection) आवश्यक असतं. तीन-फेज कनेक्शनमध्ये 440 व्होल्ट पॉवर असते. म्हणजेच 440व्होल्ट मोठी उपकरणं चालविण्यास सक्षम असतं. छोटी उपकरणं थेट 440 व्होल्टच्या मदतीनं चालविली तर ती खराब होतात. हे वाचा- मास्क घालायलाच नको; सरळ नाकात लावता येईल हा एअर प्युरिफायर, N-95 इतकाच सुरक्षित वीजेचा झटका लागून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. असं म्हटलं जातं, की करंटमुळे होणारे मृत्यू अनेक परिस्थितींवर अवलंबून असतात. मानवी शरीर 50 व्होल्टपेक्षा जास्त क्षमतेचा झटका फार सहन करू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. अशा परिस्थितीत एखाद्याला 440 व्होल्टचा करंट लागला तर काय होईल, याची आपण कल्पनाही नाही करू शकत. 440 व्होल्टचा करंट लागल्यास मृत्यूची शक्यता सर्वाधिक असते.