JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / कोल्हापूर महापुराचा फटका रुग्णालयांना; बोटीतून रुग्णांचे स्थलांतर, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO

कोल्हापूर महापुराचा फटका रुग्णालयांना; बोटीतून रुग्णांचे स्थलांतर, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO

Heavy rain in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूरात पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 23 जुलै: केवळ कोकणातच (Heavy rainfall in Konkan) नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातही अतिमुसळधार (Heavy rain in Kolhapur) पाऊस बरसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरातील अनेक भागांत पाणी शिरले आहे. कोल्हापुरातील या महापुराचा फटका रुग्णालय आणि रुग्णांना बसण्यास सुरुवात (flood water enters into hospital) झाली आहे. कोल्हापूर शहरातील डायमंड रुग्णालयात पुराचे पाणी शिरल्याने रुग्णांना चक्क बोटीने इतरत्र सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. काही रुग्णांना स्ट्रेचरवर झोपवून ते स्ट्रेचर बोटीवर ठेवत स्थलांतरण करण्यात येत आहे. तर काही रुग्णांचे ऑक्सिजनसोबतच बोटीतून स्थलांतरण करावे लागत आहे. अगदी थरारक पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. Mahad Tragedy: महाडमध्ये मोठी दुर्घटना; तळई गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. कोल्हापुरात आता एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मांगुर फाट्याजवळ पुराचे पाणी आले आहे. यामुळे कोल्हापुरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तब्बल दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे कोल्हापूरमार्गे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या