JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Yoga asanas for Height: उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय, 'ही' 3 योगासने ठरतील फायदेशीर

Yoga asanas for Height: उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय, 'ही' 3 योगासने ठरतील फायदेशीर

Yoga poses for Height: प्रौढ झाल्यावर उंची वाढवणं शक्य आहे का, असा प्रश्नही अनेकांना पडतो. नियमित योगासनं केल्यास त्याचा उंची वाढण्यासाठी फायदा होतो.

जाहिरात

Representative Image (Photo: Shutterstock)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : अनेक जण आपली उंची (height) वाढवण्यासाठी (increase) प्रयत्नशील असतात. कारण आपल्याला कोणी बुटकं, खुजं म्हणून चिडवू नये, असं त्यांना वाटत असतं. उंची वाढवण्यासाठी दोरीच्या उड्या मारणं (jumping rope), सायकल (cycling) चालवणं, रॉडला लटकणं असे अनेक प्रकार केले जातात; पण तुम्हाला माहिती आहे का, की योगसाधनेमुळेदेखील (yoga) उंची वाढविण्यास मदत होते. काही वेळा पोषक आहाराची कमतरता आणि चुकीचं खाणे यांचाही अनेकांच्या उंचीवर विपरीत परिणाम होतो, अशा परिस्थितीत उंची वाढवण्यासाठी काही योगासनं नियमित केल्यास त्याचा फायदा होतो. उंची वाढवण्यासाठी उपयोगी असणाऱ्या योगासनांची माहिती घेऊ या. वाचा :  केस फार पांढरे झालेत? तर ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल समस्येपासून मुक्ती धनुरासन : हे आसन पोटावर झोपून करण्याच्या प्रकारातलं एक आसन आहे. हे आसन करण्यासाठी पोटावर पालथं झोपावं. आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडावेत. त्यानंतर दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही पाय धरावेत. तुमचे पाय आणि हात शक्य तितके उंच उचला. वर पाहा आणि काही वेळ याच अवस्थेत राहा. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्यापर्यंतच्या भागाला बाण नसलेल्या धनुष्यासारखा आकार मिळतो. म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असं नाव पडलं आहे. पादहस्तासन : सुरुवातीला सरळ ताठ रेषेत सावधान स्थितीत उभे राहावं. त्यानंतर श्वास सोडा आणि हळूहळू कमरेपासून पुढच्या बाजूने झुकावं. या वेळी नाकाचा गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. हाताचे तळवे पायाच्या दोन्ही बाजूला ठेवा. तुम्ही प्रथमच हे आसन करत असाल, तर तुम्ही तुमचे गुडघे थोडेसे वाकवू शकता. तसंच पोट तुमच्या मांडीला लावू शकता. तुमची बोटं किंवा तळवे खाली ठेवू शकता. सरावाने हळूहळू गुडघे सरळ करा आणि छातीला मांड्यांचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. वाचा :  हृदयविकारांसह अनेक आजारांवर काळा तांदूळ आहे गुणकारी; वाचा सर्व फायदे पश्चिमोत्तानासन : दोन्ही पाय समोर ठेवून बसावं. गुडघे थोडे वाकवून ठेवू शकता. पाठीचा कणा सरळ ठेवावा. श्वास सोडताना, कमरेपासून पुढे वाकावं. हाताच्या बोटांनी पायाची बोटं धरावीत. उंची वाढण्यासाठी कोणती योगासनं करावीत, याची माहिती अनेकांना नसते. बहुतांश जणांची उंची पौगंडावस्थेच्या कालावधीत झपाट्याने वाढते; पण प्रौढ झाल्यावर उंची वाढवणं शक्य आहे का, असा प्रश्नही अनेकांना पडतो. नियमित योगासनं केल्यास त्याचा उंची वाढण्यासाठी फायदा होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या