मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

केस फार पांढरे झालेत? तर 'या' घरगुती उपायांनी मिळेल समस्येपासून मुक्ती

केस फार पांढरे झालेत? तर 'या' घरगुती उपायांनी मिळेल समस्येपासून मुक्ती

White Hair

White Hair

पांढऱ्या केसांच्या ( white hair) समस्येपासून मुक्त होण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय.

नवी दिल्ली, 18 नोव्हेबर:  कमी वयामध्ये केस ( hair) पांढरे होण्याच्या समस्येमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहे. केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. पांढरे केस काळे करण्यासाठी अनेक जण रासायनिक ( chemical) घटकांचा समावेश असलेल्या डायचा ( hair pack) वापर करतात. पांढऱ्या केसांची समस्या सुटावी, यासाठी कोणकोणते उपाय फायदेशीर ठरू शकतात, याचा तुम्ही शोध घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पांढऱ्या केसांच्या ( white hair) समस्येपासून मुक्त होण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय ( home remedies) .

केस पांढरे होण्याची अनेक कारणं असू शकतात. यामध्ये विचित्र जीवनशैली, आहार, जंक फूड, तणाव आणि प्रदूषण आदींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सकस आहार ( healthy diet) घेणं अत्यंत आवश्यक आहे. पालेभाज्या, दही आणि ताजी फळं यांचा आहारात समावेश करावा. याशिवाय काही छोट्या उपायांनीही तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. तुम्ही कोणते घरगुती उपाय करून पांढऱ्या केसांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता, ते पाहू या.

1. आवळा आणि शिकेकाई केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळा आणि शिकेकाई एकत्र पाण्यात उकळा. त्यानंतर त्याचा पल्प काढून त्यापासून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना हेअर पॅक म्हणून लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. तुम्ही आवळा आणि शिकेकाई उकळण्यासाठी वापरलेल्या पाण्यानेही केस धुऊ शकता. या उपायामुळे तुमच्या पांढऱ्या केसांना नैसर्गिक काळा रंग येण्यास मदत होईल.

2. गरम पाण्यात मेंदी पावडर टाकून चांगली मिसळा. तुमचे केस कोरडे असतील तर तुम्ही त्यामध्ये दही घालू शकता. हातमोजे घाला आणि तयार केलेली पेस्ट केसांना लावा. गडद रंगासाठी 2-3 तास ही पेस्ट तशीच राहू द्या. मेंदीच्या पानांमध्ये असलेला रंग हा पांढऱ्या केसांवर उपचार करण्यास मदत करीलच. त्याचबरोबर केस मऊ आणि निरोगीदेखील करील.

3. मेथीच्या बिया पाण्यात उकळून थंड होऊ द्या. केस धुण्यासाठी या बियांमध्ये लिंबाचा रस मिसळा. तुम्ही कोरफडदेखील यात मिसळली, तर तुम्ही सर्व घटकांची पेस्ट बनवू शकता आणि नंतर हेअर पॅकच्या स्वरूपात ती केसांना लावू शकता. हा हर्बल हेअर पॅक तुमच्या पांढर्‍या केसांना सुंदर बनवण्यास मदत करतो. तसंच केसांना निरोगीदेखील बनवतो.

4. पांढरे केस चमकदार आणि मऊ करण्यासाठी तुम्ही कॉफी वापरू शकता. कॉफीमध्ये पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि एक किंवा दोन तास राहू द्या. त्यानंतर केस पाण्याने धुवा.

5. जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या गरम पाण्यात उकळा. त्यामध्ये कोको पावडर आणि कढीपत्ता घालून पेस्ट तयार करू शकता. ही पेस्ट केसांना लावा. केस धुतल्यानंतर त्यांचा रंग लाल दिसेल.

पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका व्हावी, यासाठी काही सोपे घरगुती उपाय केल्यास त्याचा फायदा मिळतो. तसेच हे उपाय करण्यासाठी फार खर्चदेखील येत नाही.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Woman hair