मुंबई, 17 नोव्हेंबर : सर्वसाधारणपणे सर्वांकडे पांढरा तांदूळ खाल्ला जातो. काहीजण तपकिरी तांदूळही खातात. पण कदाचित तुम्ही काळा तांदूळ (black rice) कधी खाल्ला नसेल. अनेकांना काळ्या तांदळाबद्दल फारशी माहिती नाही. महत्त्वाचे म्हणजे पांढर्या आणि तपकिरी तांदळाच्या तुलनेत काळा तांदूळ आरोग्यासाठी कितीतरी पटीने जास्त फायदेशीर आहे. या दोन तांदळांच्या तुलनेत काळ्या तांदळाची लागवड फारच कमी असल्यानं लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे. आज आपण काळ्या तांदळाचे गुणधर्म आणि फायदे जाणून घेऊयात. काळ्या तांदळात भरपूर प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडंट असतात त्यामुळे आरोग्यासाठी त्याचे एक नाही तर अनेक फायदे होतात. त्याबद्दल जाणून (health benefits of black rice) घेऊया. अधिक प्रथिने आणि फायबर पांढऱ्या आणि तपकिरी तांदळाच्या तुलनेत काळ्या तांदळात अनेक पटीने जास्त प्रथिने आढळतात. इतकेच नाही तर या भातामध्ये फायबर देखील इतर तांदळाच्या तुलनेत अनेक पटीने जास्त असते. त्यात लोहाचे गुणधर्मही भरपूर आहेत. चवीविषयी बोलायचे झाल्यास त्याची चवही चांगली आहे. अशक्तपणा आणि अल्झायमरची समस्या काळ्या तांदळाच्या सेवनाने अशक्तपणा आणि थकवा येण्याची समस्या दूर होते. यासोबतच अल्झायमरची समस्याही याच्या सेवनाने हळूहळू कमी होऊ लागते. मधुमेहाचा त्रास असेल तर बाकीचे भात खाणे टाळले जाते, पण मधुमेह असला तरीही हा भात तुम्ही खाऊ शकता. हे वाचा - Health benefits of dates: हिवाळ्यात खजूर खाण्याचे आहेत अनेक फायदे, इतक्या सर्व आजारांपासून रहाल दूर हृदयाशी संबंधित समस्या अँथोसायनिन नावाचा घटक काळ्या तांदळात आढळतो. हा असा एक घटक आहे जो हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतो. याच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्याची समस्याही दूर होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते. हे वाचा - Joint Pain In Winters : सांधे जखडत असतील तर या 5 गोष्टी खाण्याचे टाळाच; हिवाळ्यात होतो जास्तच त्रास शरीर डिटॉक्स काळ्या तांदळाच्या सेवनाने बॉडी डिटॉक्स होते. वास्तविक हा तांदूळ अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. हे अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर होतात आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.