JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सत्यजीत रे दिलीप कुमारांना का म्हणायचे मेथड किंग? पाहा काय आहे गंमतीशीर किस्सा

सत्यजीत रे दिलीप कुमारांना का म्हणायचे मेथड किंग? पाहा काय आहे गंमतीशीर किस्सा

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हे नाव त्यांना सत्यजीत रे (Satyajit Ray) यांनी ठेवलं होतं. अन् या नावामागे देखील एक गंमतीशीर किस्सा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 7 जुलै**:** जवळपास सहा दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. (dilip kumar passed away) हिंदूजा रुग्णालयात सकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. जगभरातील चित्रपट समिक्षक त्यांना ‘मेथड किंग’ (Method King) म्हणून ओळखायचे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हे नाव त्यांना सत्यजीत रे (Satyajit Ray) यांनी ठेवलं होतं. अन् या नावामागे देखील एक गंमतीशीर किस्सा आहे. मोहम्मद युसूफ खान कसे झाले दिलीप कुमार? वाचा नावामागची काय होती कहाणी 50 च्या दशकात चित्रपटांमध्ये आजच्या सारखे मोठमोठे डायलॉग्स उच्चारले जात नसतं. तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे अभिनेते आपल्या हालचाली आणि चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्समधून तो सीन करायचे. अन् यामध्ये दिलीप कुमार खूपच एक्सप्रर्ट होते. त्या काळातील जवळपास सर्वच कलाकार रंगभूमीवरून चित्रपटात काम करु लागले होते. त्यामुळे चेहऱ्यावरील हावभावांऐवजी डायलॉग्सवर त्यांची अधिक कमांड होती. परंतु दिलीप कुमार यांनी कॅमेराचं तंत्र खूपच कमी वेळात आत्मसाद केलं. अलव‍िदा Dilip Kumar :…आणि मधुबाला यांना शेवटचं पाहताना पाणावले होते दिलीप कुमार यांचे डोळे शिवाय ते पठडीबाज हिरोंऐवजी व्यक्तिरेखांना अधिक महत्व द्यायचे. प्रत्येक वेळी आपल्या व्यक्तिरेखेत एखादा नवा एलिमेंट टाकता येतो का याचा प्रयत्न करायचे. त्यांची हिच प्रवृत्ती सत्यजीत रे यांना प्रचंड आवडायची त्यांमुळे त्यांनी दिलीप कुमार यांना ‘मेथड किंग’ असं म्हणायला सुरुवात केली. अनेक मुलाखतींमध्ये ते त्यांचं नाव मेथड किंग म्हणूनच घ्यायचे. अन् पुढे संपूर्ण सिनेसृष्टीच त्यांना त्याच नावानं पुकारु लागली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या