नेहा कक्करची स्पर्धकांना टिप्स
मुंबई 5 जुलै : प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचे (Neha Kakkar) आता भारतातच नाही तर देशाबाहेरही चाहते आहेत. आपल्या आवाजाने तिने मोठी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडची (Bollywood singer) अनेक गाणी तिने गायली आहेत. पण तिच्या आयुष्यात असाही प्रसंग आला होता जेव्हा ती नैराश्यात गेली होती. नेहा ही ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol) या लोकप्रिय रिॲलिटी शो ची जज आहे. त्यामुळे ती सतत चर्चेत असते. पण याच दरम्यान काही वर्षांपूर्वी नेहाचं आयुष्य नैराश्यात गेलं होत. कारण नेहाच नाव याचं कार्यक्रमातील एका स्पर्धकाशी जोडल गेलं होत.
‘द फॅमिली मॅन 2’च्या राझीचा बॅकलेस बोल्ड अंदाज; फोटो पाहून चाहते घायाळ2019 मधील गोष्ट आहे जेव्हा नेहाच नाव विभोर पराशर (Vibhor Parashar) याच्याशी जोडलं जातं होत. तर त्या दोघांच्या डेटिंगच्याही बातम्या येत होत्या. त्यांनी अनेकदा एकत्र concerts ही केल्या होत्या.
त्याच्या वर्षभर आधीच नेहा च हिमांश कोहली (Himansh Kohali) या तिच्या बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप झालं होतं. त्यामुळे नेहा आधीच दुःखात होती. आणि तिच्या विषयी नको त्या गोष्टी बोलल्या जात होत्या. यामुळे नेहा फारच नैराश्यात गेली होती. व याविषयी तिने सोशल मीडिया वर एक मोठी पोस्टही लिहिली होती.
या पोस्ट मध्ये नेहाने आपलं दुःख व्यक्त केलं होतं. आपण दुःखात असल्याचं म्हटलं होतं. व आपण आत्महत्येचाही विचार केल्याचं तिने सांगितलं होतं.
पण नंतर नेहाने स्वतःला सावरत आपल्या करिअर कडे पुन्हा एकदा फोकस केला. आपलं गाणं हे सुरूच ठेवलं. मागील वर्षी ऑक्टबर महिन्यात तिने रोहन प्रीत सिंग यांच्याशी विवाह केला ते आता आनंदी जीवन जगत आहेत.