JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Virat Anushka ट्रिपला जाण्याचा प्लॅन करतानाचा VIDEO व्हायरल; TV जाहिरातीत दिसले एकत्र

Virat Anushka ट्रिपला जाण्याचा प्लॅन करतानाचा VIDEO व्हायरल; TV जाहिरातीत दिसले एकत्र

विराट कोहली (virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka sharma) हे स्टार कपल (Star Couple) पुन्हा एकदा एका नवीन टीव्ही कमर्शियल जाहिरातीत (New Commercial Advertise) दिसलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 फेब्रुवारी : विराट कोहली (virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka sharma) हे स्टार कपल (Star Couple) पुन्हा एकदा एका नवीन टीव्ही कमर्शियल जाहिरातीत (New Commercial Advertise) दिसलं आहे. नेहमीप्रमाणेच त्यांच्या नात्यातील केमिस्ट्रीही पाहण्यासारखी आहे. ही जाहिरात एका स्टील ब्रँडची आहे. मुलीच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी पहिल्यांदाच ही जाहिरात केली आहे. या जाहिरातीमध्ये अनुष्का आणि विराट बेडवर पडले असून ते दोघे कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करताना दिसत आहेत. या जाहिरातीत अनुष्काने हिरव्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली दिसत आहे, तर विराटने ब्राऊन रंगाचा शर्ट आणि पांढरी पँट घातली आहे. या सीनमध्ये अनुष्का फिरायला जाण्यासाठी काय काय करता येईल याचा तपास करत आहे, तर विराट लाल रंगाचा चेंडू कॅच करताना दिसत आहे. यावेळी अनुष्का म्हणते की, ‘तिला बंजी जंपिंग सारख्या तत्सम साहसी क्रिया करायच्या आहेत. पण विराटला बीचवर निवांत आराम करायचा आहे. त्यानंतर अनुष्का त्याच्या आळशीपणावर चिडते आणि म्हणते की मी एकटीच अॅडव्हेंचर करण्यासाठी जाईल. त्यावर विराट म्हणतो, “माझं अॅडव्हेंचर मला सोडून जाणार.” त्यानंतर अनुष्का हसून दुसर्‍या पर्यायाचा विचार करू लागते, ‘ज्यामध्ये अॅव्हेंचरही असेल आणि समुद्र किनारी निवांत आरामही करता येईल.’

ही जाहिरात गेल्या आठवड्यात यूट्यूबवर प्रसिद्ध झाली आहे. परंतु अनुष्काने गरोदरपणाची घोषणा करण्यापूर्वी ही जाहिरात ऑगस्टमध्ये शूट केली असावी, अशी शक्यता आहे. या जोडीने यापूर्वीही या ब्रॅन्डसाठी बर्‍याच जाहिराती शूट केल्या आहेत.  11 जानेवारीला अनुष्का आणि विराट यांच्या मुलीने जन्म घेतला आहे. याची माहिती विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. ती पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या