JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Hardeek Joshi : हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न कधी? चाहत्यांनी विचारले प्रश्न

Hardeek Joshi : हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न कधी? चाहत्यांनी विचारले प्रश्न

अभिनेता हार्दीक जोशी आणि अक्षया नाईक यांची लगीन घटिका समीप आली आहे. दोघांच्या केळवणाचे फोटो समोर आलेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि राणा दा . ही जोडी आता लवकरच आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा साखरपुडा पार पडला. अचानक साखरपुडा करत दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता ही जोडी काही दिवसातच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांच्या केळवणाची सुरूवात झाली आहे. अभिनेता हार्दीक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची तयारी सुरू झालीये. हार्दीकनं त्याच्या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. एकीकडे अक्षया तिच्या मित्र मैत्रिणींबरोबर बॅचरल पार्टी करतेय तर दुसरीकडे हार्दीक त्याच्या कुटुंबियांबरोबर केळवणाची मज्जा घेत आहे.  हार्दीकचं केळवण त्यानं बहिणीकडून सुरू केलं आहे. अत्यंत साग्रसंगीत पद्धतीनं त्याच्या केळवणाचा शुभारंभ झाला आहे. केळीच्या पानावर अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीनं हार्दीकनं केळवणाचा आस्वाद घेतलाय. ‘बहिणीकडून केळवणाची सुरूवात’, असं म्हणत हार्दीकनं सुंदर फोटो शेअर केला आहे. हेही वाचा - Akshaya deodhar : केसात गजरा आणि नेसलेली लुंगी; पाठकबाईंची खास साऊथ इंडियन स्टाईल बॅचलर पार्टी

संबंधित बातम्या

तर दुसरीकडे हार्दीकची होणारी बायको म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर बॅचरल पार्टीचा आनंद घेत आहे. अक्षयानं काही हटके पद्धतीत ही पार्टी केलीय. सध्या ती मित्र मैत्रिणींबरोबर आऊटींगला गेली असून लग्नाआधीचे काही खास क्षण एजॉय करत आहे. अक्षयानं केलेली पार्टी साधी सुधी नाही तर खास साऊथ इंडियन स्टाईलमध्ये होती.

हार्दीकच्या केळवणाचे फोटो पाहून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आतूरता लागली आहे. हार्दीकचे फोटो पाहून चाहत्यांनी त्याला आता लग्न कधी? असे अनेक प्रश्न विचारले आहेत.  दरम्यान हार्दीक जोशी बिग बॉस मराठी 4मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र आता जर तो केळवण करत असेल तर बिग बॉस सुरू होईल तेव्हा त्याचं लग्न होण्याची शक्यता आहे. मग हार्दीक शोमध्ये कसा सहभागी होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या