जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Akshaya deodhar : केसात गजरा आणि नेसलेली लुंगी; पाठकबाईंची खास साऊथ इंडियन स्टाईल बॅचलर पार्टी

Akshaya deodhar : केसात गजरा आणि नेसलेली लुंगी; पाठकबाईंची खास साऊथ इंडियन स्टाईल बॅचलर पार्टी

Akshaya Deodhar

Akshaya Deodhar

हार्दिक आणि अक्षयाच्या लगीनघाईला झाली सुरुवात. नुकतीच पार पडली अक्षयाची बॅचलर पार्टी. जाणुन घ्या अपडेट्स

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21  सप्टेंबर : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत  राणादा आणि अंजली या भूमिकेतून ऑनस्क्रिन एकत्र दिसलेल्या जोडीला आता प्रत्यक्ष आयुष्यातही एकत्र पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मे महिन्यात साखरपुडा करून त्यांनी तुझ्यात जीव रंगला असं वचन दिलं. आता या दोघांच्या लग्नाचे वेध चाहत्यांना लागले आहेत. आता नवरीबाईची  म्हणजेच अक्षयाची बॅचलर पार्टी देखील झालीये. पण ही  पार्टी साधी सुधी नाही तर खास साऊथ इंडियन स्टाईलमध्ये पार पडलीये. हार्दिक आणि अक्षया लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत हे नक्की असलं तरी त्यांच्या वेडिंग डेटबद्दल कोणताही अपडेट समोर आलेला नाही. पण या जोडीच्या लगीनघाईला सुरुवात झाल्याचं मात्र समोर आलं आहे. कारण नुकतीच अक्षयाची बॅचलर पार्टी पार पडली. अक्षया सध्या मैत्रिणींसोबत साऊथ इंडियात सुट्ट्या एन्जॉय करतीये. तिथेंचझ तिने बॅचलर पार्टी साजरी केली. आता साऊथ इंडियात म्हटल्यावर खास त्याच स्टाईलमध्ये तिची पार्टी झाली. अक्षयच्या मैत्रिणींनी या पार्टीचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अक्षया सहित  सगळ्या मैत्रिणींनी खास साऊथ इंडियन लुंगी नेसली आहे. तसंच  लक्षणे केसांमध्ये गजरा माळलेला सुद्धा दिसतोय. हेही वाचा - Hruta Durgule : हृताला कधीच करायचं नाही नवऱ्यासोबत काम; म्हणाली ‘आयुष्यभर सोबत राहायचं ठरवलं तेव्हाच… अक्षया आणि हार्दिक कायम चर्चेत असतात. ही  दोघे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या  लंडन ट्रीप च्या फोटोंची तर प्रचंड चर्चा झाली होती. . त्यापूर्वी हार्दिक आणि अक्षयाने कोकणातील निसर्गाचा आनंदही लुटला. हार्दिक आणि अक्षया यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना मालिकेतही आवडली होती आणि आता प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांची केमिस्ट्रीवर चाहते कमेंट करत असतात.

News18लोकमत
News18लोकमत

सध्या अक्षया आणि हार्दिक दोघेही वर्क फ्रंटवर बरेच ऍक्टिव्ह आहेत. हे दोघे लवकरच ‘चतुरचोर’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा एकत्रित हा पहिलाच सिनेमा आहे. आता चाहते त्यांच्या सिनेमासाठी उत्सुक आहेतच पण त्याआधी लग्नासाठी जास्त उत्सुक आहेत. अक्षया आणि हार्दिकने साखरपुड्याची घोषणा करत सगळ्यांनाच सरप्राईज दिले होते. आता ह्या दोघांचं लग्न नक्की कधी आहे याची चाहते वाट पाहतायत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात