जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नाआधीच व्हेकेशनवर गेले राणा-अंजली, याठिकाणी घेताहेत सुट्टीचा आनंद

लग्नाआधीच व्हेकेशनवर गेले राणा-अंजली, याठिकाणी घेताहेत सुट्टीचा आनंद

लग्नाआधीच व्हेकेशनवर गेले राणा-अंजली, याठिकाणी घेताहेत सुट्टीचा आनंद

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे राणा आणि अंजली होय. अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) या भूमिका साकारत अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जून-   ‘तुझ्यात जीव रंगला’   (Tujhyat Jeev Rangala)  या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे राणा आणि अंजली होय. अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) या भूमिका साकारत अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं होतं. या दोघांची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. आता हे ऑनस्क्रीन कपल ऑफस्क्रीन कपल बनलं आहे. या दोघांनी गुपचूप साखरपुडा करत सर्वानांच सुखद धक्का दिला होता. त्यांनतर आता अक्षया नि हार्दिक एकमेकांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. हे दोघे सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असतात. नुकतंच या दोघांनी आपल्या इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फटोमध्ये दोघेही अतिशय रोमँटिक अंदाजात पोज देताना दिसून येत आहेत. हे दोघेही समुद्रकिनाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या दोघांनी एकसारखा पोशाख परिधान केला आहे. हे दोघेही सध्या सोशल मीडियावर कपल गोल देताना दिसत आहेत.

जाहिरात

अक्षया आणि हार्दिकने शेअर केलेल्या या रोमँटिक फोटोवर चाहते आणि कलाकार मंडळी भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. या फोटोमध्ये हार्दिक अक्षयाच्या कपाळावर किस करताना दिसून येत आहे. या दोघांना हा अंदाज चाहत्यांना फारच पसंत पडत आहे. हे दोघे सध्या नांदगाव, भोईसर बीचवर आपली सुट्टी एन्जॉय करत आहेत. लग्नाआधी या दोघांची ही ट्रिप फारच चर्चेत आहे. (हे वाचा: ‘या आठवणी कायम स्मरणात राहतील’; उमेश कामतची ‘ती’ पोस्ट नेमकी कोणासाठी? **)** झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अंजली बाई आणि राणादा या ऑनस्क्रीन जोडीला खूप लोकप्रियता मिळाली होती. ही ऑनस्क्रीन जोडी आता आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत एंगेज झाली आहे. अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे सेलिब्रिटी कपल आता विवाह बंधनात अडकणार आहेत. चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात