जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / तुझ्यात जीव रंगला : राणादा- अंजलीच्या आयुष्यातील तो स्पेशल दिवस चाहत्यांच्या आजही लक्षात, शुभेच्छांचा होतोय वर्षाव!

तुझ्यात जीव रंगला : राणादा- अंजलीच्या आयुष्यातील तो स्पेशल दिवस चाहत्यांच्या आजही लक्षात, शुभेच्छांचा होतोय वर्षाव!

तुझ्यात जीव रंगला : राणादा- अंजलीच्या आयुष्यातील तो स्पेशल दिवस चाहत्यांच्या आजही लक्षात, शुभेच्छांचा होतोय वर्षाव!

tuzyat jiv rangala : राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर याच मालिकेमुळे दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज या मालिकेसाठी खास दिवस आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 मार्च- झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ (  tuzyat jiv rangala ) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र आजही या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षक मिस करतान दिसतात. या मालिकसोबत यातील कलाकारांसोबत प्रेक्षकांच्या खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत. यातील अंजली बाई आणि राणादाच्या ऑनस्क्रीन जोडीने रसिकांची भरपूर पसंती मिळवली होती. राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर याच मालिकेमुळे दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज या मालिकेसाठी खास दिवस आहे. याच दिवशी मालिकेत अंजली आणि राणादाने लग्नगाठ बांधली होती. प्रेक्षकांच्या हे लक्षात आहे. प्रेक्षकांकडून या जोडीला यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मालिकेत अंजलीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अक्षया देवधरने तिच्या इन्स्टा स्टोरीला काही फोटो ठेवले आहे. हे फोटो या दोघांच्या लग्नाचे आहेत. चाहत्यांनी हे फोटो शेअर करत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये काही फॅन पेजचा समावेश आहे. मालिका संपली असली तरी प्रेक्षकांच्या मनात राणादा आणि अंजलीच्या लग्नाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. अक्षयाने यासाठी सर्व चाहत्या वर्गाचे आभार देखील मानले आहेत. वाचा- फुलाला सुंगध.. मालिकेत दोन अभिनेत्रींची एंट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियासह टीव्ही विश्वातही रंगली होती. कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची सधनता, गावात असलेली प्रतिष्ठा हे सगळं असताना देखील राणादाने साध्यापणाने लग्न केलं होत. साधेपणानेसुद्धा लग्नसमारंभ कसा पार पडू शकतो असाच काहीसा संदेश राणा-अंजलीच्या लग्नातून देण्यात आला होता. आजही हे लग्न प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.

जाहिरात

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दोघेही सध्या झी मराठीवरील वेगवेगळ्या मालिकेत दिसत आहेत. या दोघांना आजही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसते. हे तर काहीच नाय ..हा शो होस्ट करताना अक्षया देवधर दिसते. तर हार्दिक जोशी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..या झी मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अधून मधून हे दोघे एकादे रील्स शेअर करत असता. प्रेक्षकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळतो. प्रेक्षक आजही या जोडीला मिस करताना दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात