जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Hardeek Joshi: लग्नाआधीच पाठकबाई आणि राणादामध्ये बिनसलं; राणा-अंजलीचं भर रस्त्यातच भांडण, पाहा Video

Hardeek Joshi: लग्नाआधीच पाठकबाई आणि राणादामध्ये बिनसलं; राणा-अंजलीचं भर रस्त्यातच भांडण, पाहा Video

Hardeek Joshi: लग्नाआधीच पाठकबाई आणि राणादामध्ये बिनसलं; राणा-अंजलीचं भर रस्त्यातच भांडण, पाहा Video

रियल लाईफमध्ये लवकरच लग्न बंधनात अडकणाऱ्या राणा दा आणि पाठकबाईंमध्ये कडाक्याचं भांडण झालं आहे. हार्दिक आणि अक्षयामध्ये नेमकं काय झालं?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 13 जुलै: मराठी टीव्ही क्षेत्रात ज्या जोडीने धुमाकूळ घातला ते म्हणजे राणा दा आणि पाठकबाई म्हणजेच (Hardik Joshi & Akshaya Deodhar couple) हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. मालिकेतील रील जोडीने रियल आयुष्यात सुद्धा एकमेकांना जोडीदार म्हणून पसंत केलं आहे. हार्दिक आणि अक्षया यांचा साखरपुडा झाला असून काही काळातच त्यांचं लग्नसुद्धा होणार आहे. पण लग्नाआधीच या कपलमध्ये जोरदार भांडण झाल्याचं दिसून आलं आहे. हार्दिकने शेअर केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये पाठकबाई राणा दाची अगदी कॉलर पकडून खबर घेताना दिसत आहे. नितीश चव्हाण हा अभिनेता सुद्धा या खास फनी व्हिडिओचा भाग झाला आहे. या विनोदी व्हिडिओमध्ये हार्दिक नितीशशी बोलताना म्हणतो, “भाई, पितळ्याला घासून त्याचं कधी सोनं नाही बनत” त्यावर नितीश त्याला असं का विचारतो आहेस असा प्रश्न करतो त्यावर हार्दिक सांगतो, “यासाठी सांगतोय कारण माझी बायको ब्युटी पार्लरमध्ये गेलीये” असं म्हणत असतानाच अंजलीबाईंची एंट्री होते आणि अक्षया हार्दिकचा चांगला समाचार घेताना दिसते. लग्नाआधीच हार्दिकची कॉलर पकडून अक्षया दम देताना दिसत असल्याचं पाहून चाहत्यांना हसू आवरणं कठीण झालं आहे. हार्दिक आणि अक्षया दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. काहीच दिवसांपूर्वी अक्षयाने हार्दिकसाठी घेतलेला उखाणा खूप गाजताना दिसत होता. सध्या हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरल्याचं दिसून येत आहे. ‘दोघांनाही पाठकबाईंनी हाणलं असणार’ असं एक युजर हसतहसत लिहितो.

जाहिरात

हार्दिक आणि अक्षया एकाच सिरिलमध्ये कपल म्हणून खूप प्रसिद्ध झाले होते. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत त्यांनी केलेलं पात्र बरंच गाजलं होतं. आता हे दोघे खऱ्या आयुष्यात सुद्धा विवाहबद्ध होणार आहेत. हे ही वाचा-  Priya Bapat : ‘देवाने सगळं काही दिलं पण…’, प्रिया बापटने व्यक्त केली खंत; सोशल मीडियावर पोस्ट केला VIDEO “त्यांच्या या जोडीला कायमच भरभरून प्रेम मिळत आलं आहे. सध्या हे कपल लंडनमध्ये फिरायला गेलं असून तिथेच त्यांची भेट अभिनेता नितीश भावांशी झाल्याचं दिसून येत आहे. सध्या मराठीतील अनेक कलाकार लंडनमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. नितीश चव्हाण हा अभिनेता सुद्धा सायली संजीव आणि आशय कुलकर्णी यांच्यासोबत नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात