मुंबई 29 एप्रिल**:** तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. जेठालाल, बापुजी, मास्टर भीडे, पोपटलाल,अब्दुल मालिकेतील सर्वच पात्र दररोज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. मात्र तारक मेहताच्या टीममधील एक व्यक्तिरेखा आता कमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अन् ही व्यक्तिरेखा आहे नट्टू काका (Nattu Kaka) यांची. तब्बल एक महिना झाला आहे परंतु नट्टू काकांना मालिकेच्या सेटवर बोलावलेलं नाही. किंबहुना फोन केल्याशिवाय सेटवर येऊ नका अशी सक्त ताकीदच त्यांना मिळाली आहे. नट्टू काका ही भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक (Ghanashyam Nayak) यांनी अलिकडेच जनसत्ताला दिलेल्या मुलाखतीत आपल्या सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. ते म्हणाले, “जवळपास एक-दीड महिना उलटून गेला आहे. मला अद्याप सेटवर बोलावलेलं नाही. दोन महिन्यांपुर्वी एका सीनसाठी मला बोलावलं होतं तेव्हापासून मी घरीच आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा मला फोन करुन बोलावलं जाईल. उगाचच सेटवर येऊ नका असं मला निर्मात्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता मी केवळ त्यांच्या फोनच्या आशेवर घरी बसलोय.” ‘साधा नाही तो फार लबाड आहे’; गोविंदानं केली करण जोहरची पोलखोल
मालिकेच्या स्टोरीलाईननुसार नट्टू काका हे जेठालालच्या दुकानातील मॅनेजर आहेत. नट्टू काका आणि त्यांचा भाचा बागा हे दोघं मिळून नेहमीच काहीना काही गोंधळ घालत असतात. अन् हा गोंधळ जेठालालला निस्तरावा लागतो. खरं सांगायचं झालं तर या गोंधळामुळंच प्रेक्षक खळखळून हसतात. नट्टू काकांचं वय 60 पेक्षा अधिक आहे. शिवाय तारक मेहताच्या सेटवर सध्या एकामागून एक कोव्हिड पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यामुळं नट्टू काकांना मालिकेतून सध्या दूर ठेवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया निर्माता आसित मोदी यांनी दिलेली नाही.