मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘साधा नाही तो फार लबाड आहे’; गोविंदानं केली करण जोहरची पोलखोल

‘साधा नाही तो फार लबाड आहे’; गोविंदानं केली करण जोहरची पोलखोल

गोविंदाने करण वर घराणेशाहीचाही आरोप लावला होता. गोविंदाने दिग्दर्शक ,निर्माता करण जोहर (Karan Johar) विषयी आपलं मत मांडलं आहे.

गोविंदाने करण वर घराणेशाहीचाही आरोप लावला होता. गोविंदाने दिग्दर्शक ,निर्माता करण जोहर (Karan Johar) विषयी आपलं मत मांडलं आहे.

गोविंदाने करण वर घराणेशाहीचाही आरोप लावला होता. गोविंदाने दिग्दर्शक ,निर्माता करण जोहर (Karan Johar) विषयी आपलं मत मांडलं आहे.

मुंबई 29 एप्रिल : 90 च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा (Govinda) आजही त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम घर करुन आहे. गोविंदा आता चित्रपटांत जास्त दिसत नसला तरीही त्याचा फॅनफोलोइंग कमी नाही. तो अनेकदा निरनिराळ्या कार्यक्रामांत हजेरी लावताना दिसतो. यावेळी त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक ,निर्माता करण जोहर (Karan Johar) विषयी आपलं मत मांडलं आहे.

गोविंदाने एकदा करण जोहर वर टिका केली होती. तर त्याच्यामुळेचं आपला चित्रपट चालला नाही असा आरोपचं गोविंदाने करण वर केला होता.2017 साली अनेक दिवसानंतर गोविंदाचा ‘आ गया हिरो’ (aa gya hero)  हा चित्रपट आला होता. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या बरोबर एक आठवड्यानंतर करण जोहरने त्याच्या धर्मा प्रोडक्शन निर्मित अभिनेता वरुन धवन आणि आलिया भट्टचा ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ (Badrinath ki Dulhania) हा चित्रपट प्रदर्शित केला. परिणामी गोविंदाचा ‘आ गया हिरो’ हा चित्रपट बॉक्सऑफिस चालला नाही. याचं कारण गोविंदाने करण ला मानलं होत.

पिंकविला या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, गोविंदाने करण वर घराणेशाहीचाही आरोप लावला होता. "गेल्या ३० वर्षांत त्याने कधीच मला बोलावलं नाही, मला तर ही सुद्धा शंका आहे की तो त्याच्या मित्रपरिवारा व्यतिरिक्त इतर अभिनेत्यांकडे बघतं ही असेल की नाही आणि त्यांना हाय हॅलोसुद्धा बोलत नसेल,"

‘ताई आधी पूर्ण माहिती घ्या मग आम्हाला सांगा’; Corona Vaccine मुळं कंगना होतेय ट्रोल

पुढे गोविंदा म्हणाला, "करण हा दयाळू नाही. करणचा हा सगळा प्लॅन आहे. माझा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या एक आठवड्यानंतर त्याने तो चित्रपट प्रदर्शित केला. मला तो कधीच सरळ किंवा निरागस वाटलाच नाही.” गोविंदा म्हणाला. गोविंदाने करण विषयी ही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय “त्याने मला कधीच कॉफी विथ करण शो साठी आमंत्रण दिलं नाही.” असही गोविंदा म्हणाला.

ही गोष्ट करण ला समजताच करण ने यावर दिलगीरी व्यक्त केली होती. व आपण त्याला शो मध्ये बोलावणार आहोत असही करण म्हणाला होता. पण गोविंदाने ते स्वीकारलं नाही. "करण दाखवतो की तो खूप नम्र आणि सरळ आहे, परंतु तो मला डेव्हिड पेक्षा जास्त हेवा करणारा वाटतो." अस गोविंदा म्हणाला होता. गोविंदाने 90 च्या दशकात अनेक चित्रपटांत काम केलं तसेच अनेक चित्रपट हे सुपटहिट ठरले होते. त्याच्या डान्सचे तर आजही अनेकजन दिवाने आहेत.

First published:

Tags: Bollywood, Karan Johar