JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / स्वरा भास्करनं उडवली आई-वडिलांची खिल्ली; शेअर केले खासगी मेसेज

स्वरा भास्करनं उडवली आई-वडिलांची खिल्ली; शेअर केले खासगी मेसेज

स्वरानं आपल्या आई-बाबांचे रोमँटिक चॅट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिनं आपल्या फॅमिली चॅटचा स्क्रिनशॉट काढून तो ट्विटरवर अपलोड केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 एप्रिल**:** अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या घडामोडिंवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. यामुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. परंतु यावेळी ती एका वेगळ्याच कारण्यामुळं चर्चेत आहे. स्वरानं चक्क तिच्या आई-वडिलांचे खासगी मेसेज लीक करुन त्यांची खिल्ली उडवली आहे. तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. स्वरानं आपल्या आई-बाबांचे रोमँटिक चॅट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिनं आपल्या फॅमिली चॅटचा स्क्रिनशॉट काढून तो ट्विटरवर अपलोड केला आहे. ज्यानंतर स्वरानं त्यांना ‘तुम्ही दोघं पर्सनल चॅटवर तुमचा रोमान्स आणि फ्लर्ट करा’ असा मेसेज केला आहे. हा स्क्रिनशॉट शेअर करताना स्वरानं लिहिलं, ‘हा काळ थोडं कठीण असला तरीही आई-बाबांसोबत व्हॉट्सअॅप चॅट करणं खूप मजेदार असतं.’ तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देताना स्वत:चे देखील काही गंमतीशीर अनुभव शेअर केले आहेत. अवश्य पाहा - कोण होत्या सुमित्रा भावे? महाराष्ट्रानं गमावली समाजसुधारणेसाठी धडपडणारी दिग्दर्शिका

संबंधित बातम्या

यापूर्वी स्वरा दत्तक घेतलेल्या एका मुलीमुळं चर्चेत होती. आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं स्वरा उत्तर प्रदेशमधील बदायु येथे गेली होती. त्यावेळी तिनं तेथील एका अनाथ आश्रमाला भेट दिली. खरं तर तेथील मुलांना मदत करण्याच्या उद्देशानं ती तेथे गेली होती. परंतु या ठिकाणी तिचं लक्ष एका गोंडस मुलीनं वेधून घेतलं. या मुलीची कथा ऐकून स्वरा अत्यंत भावूक झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कारण ही मुलगी त्या अनाथआश्रमाच्या संचालिका प्रियांका जौहरी यांना एका कचऱ्याच्या डब्यात सापडली होती. या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय स्वरानं घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या