JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुहानाचा हा फोटो पाहून नेटकरी झाले सैराट; काही तासांत 11 लाख लोकांनी केलं लाईक

सुहानाचा हा फोटो पाहून नेटकरी झाले सैराट; काही तासांत 11 लाख लोकांनी केलं लाईक

सुहानाचा फॅशन सेन्स, कपडे, राहणीमान, मित्र-मैत्रिणी यांच्याविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. यावेळी सुहाना एका अनोख्या फोटोमुळं चर्चेत आहे. या फोटोमध्ये ती चक्क किचनमध्ये चीज किसताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 फेब्रुवारी : सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे सुहाना खान. शाहरुख खानची ही मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणानं नेहमीच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. तिचा फॅशन सेन्स, कपडे, राहणीमान, मित्र-मैत्रिणी यांच्याविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. यावेळी सुहाना (Suhana Khan) एका अनोख्या फोटोमुळं चर्चेत आहे. या फोटोमध्ये ती चक्क किचनमध्ये चीज किसताना दिसत आहे. (Suhana Khan bold photoshoot) सुहानानं हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोत ती किचनमध्ये चीज किसताना दिसत आहे. (grate cheese) से चीस असं तिनं या फोवर कॅप्शन दिलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वरकरणी सर्वसाधारण दिसणारा या फोटोवर काही तासांत आतापर्यंत तब्बल 11 लाखांपेक्षा अधिक चाहत्यांनी लाईक केलं आहे. यावरुन सुहानाच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

संबंधित बातम्या

अवश्य पाहा - VIDEO: नॅशनल क्रश प्रियाचा झाला अपघात; शूटिंग करताना डोक्यावर बसला मार सुहाना अमेरीकेत अभिनयाचं प्रशिक्षण घेत होती. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं ती भारतात परतली. आतापर्यंत तिनं काही इंग्रजी नाटकं आणि शॉर्टफिल्ममध्ये काम केलं आहे. तिची ‘ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ ही शॉर्ट फिल्म गेल्या काही काळाच प्रचंड चर्चेत होती. सुहाना देखील इतर स्टारकिड्सप्रमाणे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या