JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोट्यावधींची मालकीण अन् नावेतून प्रवास; या अभिनेत्रीला ओळखलंत का? VIDEO

कोट्यावधींची मालकीण अन् नावेतून प्रवास; या अभिनेत्रीला ओळखलंत का? VIDEO

अनेकदा माणसं मोठी झाली की स्वत:च्या स्टेटसला फारच जपण्याचा प्रयत्न करतात. पण या अभिनेत्रीने स्टारडम बाजूला ठेवत छोट्या नावेतूनही प्रवास केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 डिसेंबर: बाहुबली (Bahubali) सिनेमातली राजकुमारी, साऊथची टॉपची हिरोईन आणि चक्क नावेतून प्रवास? आम्ही बोलतोय अभिनेत्री अनुष्का शेट्टीबद्दल (Anushka Shetty). काही दिवसांपूर्वी एका मंदिरात जाण्यासाठी चक्क तिने एका छोट्याश्या बोटीतून प्रवास केला होता. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अनुष्काचा जवळजवळ सगळा चेहरा झाकलेला असल्यामुळे तिला ओळखणंही कठीण झालं होतं. कुठे गेली होती अनुष्का शेट्टी? अनुष्का गोदावरी तीरावर वसलेल्या पोलावरम गावातील वीरभद्र स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तिथे जाताना दुसरं कोणतंही वाहन नाही त्यामुळे तिने चक्क एका छोट्याश्या नावेतून प्रवास केला. सगळं स्टारडम बाजूला ठेवत ती देवाच्या चरणी लीन होण्यासाठी तिथे गेली होती.

संबंधित बातम्या

कोरोना काळात सोशल मीडियावर एन्ट्री अनुष्का शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियापासून लांब होती. पण कोरोना काळात सोशल मीडियावर आगमन करत तिने चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. अनुष्का आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत असते.

जाहिरात

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, बागमती या सिनेमानंतर ती मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही. तिच्या हातात अनेक नवनवीन चित्रपट आहेत. लवकरच ती प्रक्षेकांना नव्या प्रोजेक्ट्समधून दिसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या