मुंबई, 14 नोव्हेंबर: दिवाळीनिमित्त आपण सगळेच जण एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहोत. यंदाची दिवाळी काहीशी वेगळी आहे. कोरोना (Corona)मुळे आपल्या कोणालाही एकमेकांकडे जाता येत नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देत आहोत. बॉलिवूडचे कलाकार, क्रिकेटपटूंनीही आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिसद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आणि अतिशय हृदयस्पर्शी संदेशही दिला. आशाताईंनी काय संदेश दिला? आशाताईंनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे, ‘या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा, दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या नव-वर्षात तुम्हा सर्वांच्या चिंता, दु:ख दूर होतील. आणि तुम्ही सगळे सुखी व्हाल अशी मी देवाकडे प्रार्थना करते. एखादी आई जशी आपल्या मुलाचं औक्षण करते, त्याची दृष्ट काढते तशीच मी तुम्हा सर्वांची दृष्ट काढत आहे. शुभ दिपावली.’
आशा भोसले यांनी शेअर केलेला व्हिडीओ अतिशय हृदयस्पर्शी आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या आईच्या प्रेमाची आठवण आली असेल. आशाताईंनी दिवाळीच्या इतक्या सुंदर पद्धतीने शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला अवघ्या एका तासात 16 हजार व्ह्यूज आले आहेत. 4 हजार युझर्सनी लाइक केला आहे. आशा भोसले यांचं भारतीयांच्या मनात अढळ स्थान आहे.