मूसेवालाला त्याच्या गाण्यांबद्दल अनेक खटल्यांचा सामना करावा लागला, ज्यात बंदूक संस्कृती आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिले गेले. 2020 मध्ये, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन पंजाब सरकारने त्याच्या एका गाण्यात बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
मुंबई, 29 मे- Sidhu Moosewala Passed Away: पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानसा येथे सिद्धू (Punjabi Singer Sidhu Moosewala Shot Dead ) यांच्यावर गोळी झाडण्यात आली असून या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मूसेवाला गाण्यासोबत त्यांच्या वक्तव्यामुळं देखील नेहमीच चर्चेत राहिले आहेत. पूर्ण नाव सिद्धू मूसेवाला यांचा जन्म 17 जून 1993 रोजी झाला होता. त्यांचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू असं होतं. मात्र त्यांना संगती क्षेत्राता सिद्धू मूसेवाला या नावानं ओळखलं जात होतं. पंजाबमधील मनसा जिल्ह्यातील मूसा गावचे ते रहिवाशी होते. यामुळेच त्यांनी आपल्या नावाच्या समोर मूसा असं लावलं होतं. त्यांच्या कुटुंबाविषयी सांगायचं तर, त्यांच्या वडिलांचे नाव भोला सिंह आहे तर मूसेवाला यांची आई या गावाच्या सरपंच आहेत. यांनी गायन कला शिकली आणि कॅनडा देशात गेले. इंजिनीयरिंगची डिग्री घेतली आणि नंतर गायक बनले मूसेवाला यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूसावाला मूसावाला यांनी गायन कला शिकली आणि कॅनडा देशात गेले. वाचा- ‘शक्य आहे तुम्ही जे ठरवाल ते शक्य..’ ह्रता दुर्गुळेची नवीन पोस्ट नेमकी कशाबद्दल? या गाण्यांमुळे मूसेवाला बनले स्टार सिद्धू मूसेवाला यांना त्यांच्या अनेक गाण्यामुळं लोकप्रियता मिळाली. त्यांना पंजाबमधील वादग्रस्त गायक म्हणून ओळखले जायचे. मूसेवाला हे खुलेआम पिस्तूल बाळगण्याचा संस्कृतीला गायनातून प्रोत्साहन द्यायचे. तसेच गँगस्टर लोकांवर गाण्यातून टीका करायचे. शीख योद्धे यांची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी मूसेवाला यांना माफी देखील मागावी लागली होती. वाचा- प्राजक्ता माळीनं असा घालवला आजी- आजोबांसोबत दिवस, फोटो शेअर करत म्हणाली.. संजू गाण्यामुळं निर्माण झाला होता वाद दोन वर्षापूर्वी 2020 मध्ये मूसेवाला यांच्या संजू गाण्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. एके-47 फायरिंग प्रकरणात मूसेवाला यांना जामीन मिळाल्यानंतरच गे गाणं रिलीज धालं होतं. यानंतर सोशल मीडियावर त्यांची तुलना बॉलिवूड अभिनेता संजय दत्तशी करण्यात आली होती. 2020 मेमध्ये बरनाला गावात फायरिंग रेंजमध्ये फायरिंग करत असतानाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मात्र नंतर त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला. वाचा- Fat to Fit झाली अर्जुन कपूरची बहीण अंशुला; ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क नंतर राजकारणार एंट्री मागील वर्षी मूसेवाला यांनी राजकारणार एंट्री केली. निवडणूक तोंडावर असताना त्यंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले. सिद्धू मुसेवाला यांनी 2022 साली काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना आम आदमी पक्षाचे डॉ. विजय सिंग यांच्याकडून पराभाव स्वीकारावा लागला होता.