मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /2 वर्षात Fat to Fit झाली अर्जुन कपूरची बहीण अंशुला; जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क

2 वर्षात Fat to Fit झाली अर्जुन कपूरची बहीण अंशुला; जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क

वजन कमी करण्यासाठी ती नियमित व्यायाम करत होती. डाएट चार्टसुद्धा नेटाने फॉलो करत होती. लेटेस्ट फोटोमध्ये ती नेहमीपेक्षा स्लिम दिसत आहे.

वजन कमी करण्यासाठी ती नियमित व्यायाम करत होती. डाएट चार्टसुद्धा नेटाने फॉलो करत होती. लेटेस्ट फोटोमध्ये ती नेहमीपेक्षा स्लिम दिसत आहे.

वजन कमी करण्यासाठी ती नियमित व्यायाम करत होती. डाएट चार्टसुद्धा नेटाने फॉलो करत होती. लेटेस्ट फोटोमध्ये ती नेहमीपेक्षा स्लिम दिसत आहे.

मुंबई 29 मे : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर बहुदा लाइमलाइटपासून दूर राहते. मात्र ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मागील काही काळापासून ती तिच्या जिममधील पोस्ट्स अपडेट करत होती. ज्यामध्ये ती तिचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत होतं (Weight Loss Journey) . त्यात आता तिला यश मिळालं आहे. याचा अंदाज तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या काही पोस्टवरून लावता येतो. चाहतेही तिचं कौतुक करत आहे आणि या ट्रान्सफॉर्मेशनचं रहस्य विचारत आहेत (Anshula Kapoor Transformation) .

करीना कपूरसह या अभिनेत्री दिसल्या ग्लॅमरस लूकमध्ये; खास फॅशन सेन्सने नेटिझन्सही Cool

अर्जुन कपूर आणि बोनी कपूर यांच्याप्रमाणेच अंशुलाचीही पर्सनालिटी आहे. पण आता तिने स्वतःला फिट ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. वजन कमी करण्यासाठी ती नियमित व्यायाम करत होती. डाएट चार्टसुद्धा नेटाने फॉलो करत होती. लेटेस्ट फोटोमध्ये ती नेहमीपेक्षा स्लिम दिसत आहे. यात तिची शार्प जॉ लाईन आणि ब्यूटी बोनही दिसत आहे. तसेच, तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असल्याने ती खूपच क्यूट दिसत आहे. आता या फोटोवर तिला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. लोक तिचं खूप कौतुक करत आहेत.

कुब्रासेतने लिहिलं, 'ओह दॅट स्माईल!', शनाया कपूरची आई आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूर यांनी लिहिलं, 'खूप सुंदर.' वडील बोनी कपूर यांनीही मुलीचं कौतुक केलं. त्यांनी लिहिलं, 'लुकिंग लव्हली.' प्रत्युत्तरात अंशुलाने रेड हार्ट दिलं आहे. रिया कपूरने लिहिलं, 'व्वा, तू खूप छान दिसतेस.' उत्तरात अंशुला म्हणाली, 'रिया कपूर लव्ह यू.' याशिवाय तिच्या लूकवरही चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. यासोबतच तिला वजन कमी करण्याचे उपायही विचारण्यास सुरुवात केली. एकाने लिहिलं, 'अंशुला कृपया तुमच्या वजन कमी करण्याच्या टिप्स शेअर करा.'

Disha Patani ने ट्यूब टॉप-रिप्ड डेनिममध्ये शेयर केले PICS, हॉट लूकवर चाहते झाले फिदा

दुसर्‍याने लिहिलं, 'अंशुला कपूर वाह तुमचं ट्रान्सफॉरमेशन पूर्ण झालं आहे.' एका चाहत्याने तर अंशुलाला सांगितलं की ती तिच्या आईसारखी दिसते. ज्यावर अंशुलाने उत्तरात हात जोडणारा इमोजी शेअर केला. एकजण म्हणाला, 'तू छान दिसते. तू हे कसं केलं? तुझं वजन खूप कमी झालं आहे, वजन कमी करण्याबाबतच्या टिप्स तू आमच्यासोबत शेअर करायला हव्या.'

First published:

Tags: Entertainment, Film star, Weight loss