मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्राजक्ता माळीनं असा घालवला आजी- आजोबांसोबत दिवस, फोटो शेअर करत म्हणाली..

प्राजक्ता माळीनं असा घालवला आजी- आजोबांसोबत दिवस, फोटो शेअर करत म्हणाली..

स्वराज्याचे धाकले धनी संभाजी राजे आणि त्यांच्या डोक्यावरचं छत्र अन पाठीवरची ढाल बनून राहणारे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याला सलाम करणारा 'हंबीरराव' (hambirro) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी  ( Prajaktta Mali )  हिनं देखील हा सिनेमा नुकताच पाहिला.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 मे-स्वराज्याचे धाकले धनी संभाजी राजे आणि त्यांच्या डोक्यावरचं छत्र अन पाठीवरची ढाल बनून राहणारे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याला सलाम करणारा 'हंबीरराव' (hambirro) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी  ( Prajaktta Mali )  हिनं देखील हा सिनेमा नुकताच पाहिला. विशेष म्हणजे तिनं हा सिनेमा आजी आणि आजोबा यांच्यासोबत पाहिला आहे. आजी व आजोबा यांच्यासोबतचा फोटो शेअर करत तिनं या सिनेमाचं कौतुक करणारी एक पोस्ट देखील लिहिली आहे.

प्राजक्तानं इन्स्टाला  ( Prajaktta Mali  latest post) आजी आणि आजोबा यांच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, A day with “आजी-आजोबा” आणि आम्ही “सरसेनापती हंबीरराव” पाहिला. कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट♥️.

प्रविण दादा @pravinvitthaltarde तू भारी आहेस- विषय कट.२.३० तासात तू दोन महाराजांची, त्यांच्या सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट; ज्या हुशारीनं दाखवलीस त्याला तोडच नाही.तुझ्यातला प्रेमळ, समंजस, दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला.. आणि त्यानी आम्हांला कितीतरी शिकवलं. त्यासाठी किती धन्यवाद देऊ? #केवळप्रेम@limaye.mahesh नेहमीप्रमाणे कडक कामगिरी.

प्राजक्ता मागच्या काही दिवसांपासून तिच्या रानबाजार या सिरीजमुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांचा या सिरीजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर मात्र तिला बोल्ड भूमिका साकारल्याने ट्रोल देखील करण्यात आलं. असं जरी असलं तरी वेगळी भूमिका निवडल्याने तिच्या अभिनयाचं कौतुक देखील होत आहे

First published:

Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment