मुंबई, 29 मे- मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) मागच्या काही दिवसांपासून लग्न आणि हनिमून फोटोमुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. आता ती एक नव्या कारणामुळं चर्चेत आली आहे. लवकरच हृता दुर्गुळे ( चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीचा बहुचर्चित ‘अनन्या’ (Ananya) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. येत्या 22 जुलैला हा (Release Date) सिनेमा रिलीज होणार आहे. हृता दुर्गुळेने यासंबंधी एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिच्या अनन्या या सिनेमाचं पोस्टर पोस्ट करत म्हटलं आहे की, आपणच शोधायचं असतं कवेत घेता येईल असं आपलं स्वतःचं आकाश!…. अनन्या…. शक्य आहे तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे. चाहत्यांनी देखील ह्रताच्या या पोस्टला चांगला प्रतिसाद दिला आहे. ह्रताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. वाचा- Happy Birthday Mrunmayee Deshpande: लग्न होण्याआधी का खचली होती मृण्मयी? हृताने दुर्वा मालिकेतून छोड्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर ती फुलपाखरू मालिकेत दिसली. या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. पुढे सिंगिंग स्टार या रिऍलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करताना ती दिसली. दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक आणि स्ट्रॉबेरी शेक ही शॉर्टफिल्म तिने अभिनित केली. अनन्या या चित्रपटातून हृता प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट व ड्रीमविवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव यांच्या अनन्या या आगामी चित्रपटातून हृता एक आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.
हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केली होती. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईत झाली. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना तिला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. आज हृता छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे. आता ती मोठा पडद्या गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे