यावर्षी कंगना रनौतसोबत 'पंगा' या चित्रपटातून ऋचा प्रेक्षकांच्या भेटीला आली. लवकरच तिचा 'शकीला' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'शकीला'चा ट्रेलर रिलीज झाला असून या चित्रपटात ऋचा 90 आणि 2000 च्या दशकातील अडल्ट चित्रपटांतील अभिनेत्री 'शकीला'ची भूमिका साकारताना दिसतेय. (फोटो: Richa Chadha Instagram)
अभिनेत्री रिचा चड्डाचा आगामी चित्रपट ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ सातत्याने विविध वादांमध्ये अडकत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक फोटो रिलीज करण्यात आला. यामध्ये रिचा चड्डा हातात झाडू घेऊन उभी आहे. यावर अनेकांनी टीका केली असून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली जात आहे.
अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार अनेक जणांची तिची जीभ कापण्यावर बक्षीस ठेवलं आहे तर काहींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रिचा चड्डाने एक मुलाखतीत सांगितलं की, तिच्या चित्रपटाचे पोस्टर जाळणार असल्याचं सांगितलं जात आहे. घरावर हल्ला करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
याशिवाय अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या ट्विटला रिट्विट केलं आहे. ज्यामध्ये काही कात्रणं पाहायला मिळत आहे. यामध्ये रिचा चड्डाची चीभ कापणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचं लिहिलं आहे. यावर स्वराने लिहिलं आहे की, ही खूप लज्जास्पद आहे. आणि या प्रकाराचा निषेध करायला हवा. आंबेडकारीवादी, दलित, स्त्रीवादी आणि केवळ समजूतदार लोकांनी याविरोधात उभं राहावं.
आपल्या चित्रपटाच्या पोस्टरसाठी रिचा चड्डाने माफी मागितली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं होतं की, तिच्या पोस्टरवर खूप टीका केली जात आहे. हा एक सीन होता, मात्र अनेकांना तो प्रसंग दलितांना दाखविण्याची पद्धत असल्याचं वाटलं.
चित्रपट ‘मैडम चीफ मिनिस्टर’ च्या मुख्य भूमिकेत रिचा चड्डा उत्तर प्रदेशातील एक माजी मुख्यमंत्रीकडून प्रेरित असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपट 22 जानेवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.