JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / जेवढी बोल्ड तेवढीच ट्रेडिशनल; शिल्पा शेट्टीने दिवाळीनिमित्त चाहत्यांना दिलं खास सरप्राइज

जेवढी बोल्ड तेवढीच ट्रेडिशनल; शिल्पा शेट्टीने दिवाळीनिमित्त चाहत्यांना दिलं खास सरप्राइज

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) दिवाळीनिमित्त खास सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती आणि विहान रांगोळी काढताना दिसत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 नोव्हेंबर: संपूर्ण देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दिवाळीनिमित्त खास रांगोळी काढली. यामध्ये छोट्या विहानने तिला मदत केली आहे. शिल्पा शेट्टीने विहानसोबत रांगोळी काढतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिल्पा शेट्टीने दिल्या शुभेच्छा शिल्पा शेट्टीने दिवाळीनिमित्त व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विहान त्याच्या आईला रांगोळी काढायला मदत करतो आहे. विहान नाचतानाही दिसत आहे. शिल्पा आणि विहानने दिवाळीनिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहीलं आहे, ‘रांगोळी काढणं म्हणजे लक्ष्मी मातेचं स्वागत करण्याची उत्तम पद्धत आहे.’

अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी, ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. शिल्पा शेट्टी नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे अजूनही अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. शिल्पाच्या योगा आणि हेल्थ टीप्सनाही अनेक जण फॉलो करत असतात. शिल्पाचा नवरा राज कुंद्रादेखील अधूनमधून सोशल मीडियावर फोटो शेअर करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या