Pathaan Advance Booking
मुंबई, 20 जानेवारी : शाहरुख खानच्या पठाण सिनेमाची मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे. पठाण अनेक कारणांमुळे चर्चेत आला. अभिनेता शाहरुख खान पठाणमधून तब्बल 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. पठाण 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटील येत आहे. पण सिनेमा रिलीजच्या आधीच सगळे रेकॉर्ड तोडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मोठ्या प्रमाणात सिनेमाचं अँडवान्स बुकींग करण्यात आलं आहे. सिनेमाची रिलीज डेट समोर आल्यानंतर चाहत्यांनी तात्काळ सिनेमाची तिकिटं काढली आहेत. नेमकं अँडवान्स बुकींग किती झालं पाहूयात. पठाण सिनेमाचं एकूण बजेट 250 कोटी इतकं आहे. पण ज्या स्पिडनं अँडवान्स बुकींग सुरू आहे त्यावरून पठाण सिनेमा रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल असं वाटतं आहे. केवळ भारतात नाही तर विदेशातही पठाणचं अँडवान्स बुकींग सुरू आहे. जर्मनीमध्ये रिलीजपूर्वीच सिनेमा हाऊसफुल्ल झाला आहे. पठाणच्या अँडवान्स बुकींगला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हेही वाचा - Ved Box Office Collection: रितेशच्या ‘वेड’ नं गाठला 50 कोटींचा टप्पा; अभिनेता म्हणाला ‘शब्द अपुरे…’
फिल्म क्रिटिक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार, पठाणचं एडवान्स बुकींग हे PVRमध्ये 51 हजार इतकं आहे. INOXमध्ये 38,500 इतकं आहे. तर CINEPOLISमध्ये 1,17000इतकं आहे. बॉक्स ऑफिसवर पठाणच्या अँडवान्स बुकींगनं सर्वांच्या भुवया उंचावल्यात.
सिनेमाचं अँडवान्स बुकींगचा विचार करून सिनेमा ओपनिंग कलेक्शनमध्ये 50 कोटींची कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिनेमात शाहरुख आणि दीपिका यांच्याबरोबर अभिनेता जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहे. 25 जानेवारीला सिनेमा एकूण 10 हजार स्क्रिन्सवर रिलीज होणार आहे.
त्यानंतर सिनेमाच्या ट्रेलरनं सर्वांचं लक्ष वेधलं. पण बेशरम रंग या गाण्यानं पठाण सिनेमाचे सगळेच रंग बदलून टाकले. गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद निर्माण झाला. बिकिनीच्या रंगाच्या वादावरून सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात आली. या वादानंतर पठाण 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटील येत आहे. प्रदर्शनाआधीच सिनेमानं कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे पठाण रिलीजआधी पुन्हा चर्चेत आला आहे.