JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आजारातून बरं झाल्यानंतर रेमो डिसूझांचा पत्नीबरोबर खास डान्स, ख्रिसमस स्पेशल VIDEO VIRAL

आजारातून बरं झाल्यानंतर रेमो डिसूझांचा पत्नीबरोबर खास डान्स, ख्रिसमस स्पेशल VIDEO VIRAL

रेमो डिसूझा (Remo D’Souza) यांच्या घरी दरवर्षीच ख्रिसमस (Christmas) धुमधडाक्यात साजरा केला जातो.. या वर्षीही रेमो कुटुंबाबरोबर आणि काही जवळच्या मित्रांबरोबर ख्रिसमसची साजरा करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 डिसेंबर: बॉलिवूड नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा (Remo D’Souza) यांना काही दिवसांपूर्वी कोकिलाबेन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.  हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना दिवसांपूर्वी मुंबईच्या रुग्णायलात भरती करण्यात आलं होतं. आता रेमो त्याच्या घरी विश्रांती घेत आहे आणि कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. रेमो डिसूझा यांच्या घरी दरवर्षीच ख्रिसमस (Christmas) धुमधडाक्यात साजरा केला जातो.. या वर्षीही रेमो कुटुंबाबरोबर आणि काही जवळच्या मित्रांबरोबर ख्रिसमसची साजरा करत आहेत. डिसूझा कुटुंबाच्या पार्टीतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.  रेमोचा हा व्हिडीओ अभिनेता आमिर अलीने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत रेमो आणि आमिर अली (Aamir Ali)  आणि सँटा टॉय बरोबर थिरकताना दिसत  आहे.

रेमो डिसूझा यांना हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रेमोच्या प्रकृतीनंतर त्याची पत्नी लीजलनेही त्याचा रुग्णालयातील एक व्हिडिओ शेअर केला होता. शिवाय ख्रिसमसची तयारी कशी करण्यात आली आहे याचा देखील एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.

रेमो डिसूझा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आणि मित्रांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, ’ या वर्षीचा ख्रिसमस माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट ख्रिसमस आहे. माझे सर्व मित्र, कुटुंब आणि चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. या पोस्ट मध्ये त्याने त्याच्या पत्नी लीझलचे  विशेष आभार मानले आहे .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या