मुंबई,23 मार्च : अनेक दिवसांपासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी ‘रात्रीस खेळ चाले पर्व 3’ (Ratris khel chale-3) ही मालिका अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकताच मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. Zee Marathi वरच्या या मालिकेची दोन्ही पर्व विशेष गाजली. आणि आता तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. सुरुवातीला सुंदर असा नाईकांचा कोकणातील वाडा दाखवण्यात आला. तर एक व्यावसायिक मंबईहून कोकणात हा वाडा विकत घेण्यासाठी आलेला असतो, वाडा पाहून त्याचही मन भारावून जातं. प्रत्यक्षात अण्णा नाईक त्याच स्वागत करतात पण अण्णा सोडून वाड्यात कोणीही नसतं. अण्णा त्या व्यावसायिकाच साग्रसंगीत आदरातिथ्य देखिल करतात तेही अण्णाच्या स्टाईल मधे. पण दारू प्यायल्यानंतर त्या व्यावसायिकाला तेथे भयानक दृश्यं दिसू लागतात तर तिथे काहीही नसून तो वाडा बेचिराख अवस्थेत पडलेला असतो. आणि त्यानंतर तो माणूस तिथून निघून जातो. तर तिथे अण्णा म्हणजेच अण्णाचं भूत होतं.
मालिकेच्या पुढील भागात माई आणि दत्ता दिसणार आहेत. माई रस्त्यावर आल्या तर दत्ता भीक मागाताना दिसतोय. एकंदरीतच अण्णानंतर नाईक कुटुंबावर आता अतिशय वाईट वेळ आली आहे. या ही पर्वात शेवंता दिसणार आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच (Apurva Nemleker) शेवंताची भूमिका साकारणार आहे. पण यावेळी शेवंता नव्या रंगात ढंगात दिसून येतेय. अपूर्वाने तिच्या सोशल मिडिया अकाउंट वर शेवंताचा नवा लूक प्रेक्षकांसमोर आणला आहे. यामधे ती कपाळभर मळवट भरून तसेच मोकळे केस सोडलेल्या रूपात दिसते आहे. त्यामुळे शेवंताच्या एंट्रीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
नाईकांच्या सुंदर वाड्याचं नेमकं काय झालं तसेच अण्णांनतंर माई, दत्ता हे रस्त्यावर का आले.. तर अण्णाच्या मृत्यूनंतर त्यांचं भूत हे वाड्याभोवती का फिरतंय? घरातील इतर सदस्यांचं काय झालं या सगळ्या प्रश्नांची उत्तर या पर्वात मिळणार आहेत. तेव्हा आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.