JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘माफ कर माझ्याकडून चूक झाली’; अक्षयनं मागितली नुसरतची माफी, कारण...

‘माफ कर माझ्याकडून चूक झाली’; अक्षयनं मागितली नुसरतची माफी, कारण...

अक्षयमुळं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र याच चित्रपटातील एका फोटोमुळं अक्षयला अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) हिची माफी मागावी लागली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 1 एप्रिल**:** बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव राम सेतू (Ram Setu) असं आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर देखील प्रदर्शित झालं. तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र याच चित्रपटातील एका फोटोमुळं अक्षयला अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) हिची माफी मागावी लागली आहे. नेमकं प्रकरण काय आहे**?** राम सेतू या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा देखील झळकणार आहे. तिनं नुकतंच चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये ती जेवणाच्या डब्यांसोबत उभी राहिलेली दिसत आहे. तिच्या या फोटोवर अक्षय कुमारनं गंमतीशीर प्रतिक्रिया दिली. “अन् अशा प्रकारे नुसरत लंच बॉक्सच्या सेटवर येते. माफ करा राम सेतूच्या सेटवर येते.” अशी कॉमेंट त्यानं केली. लंच बॉक्स हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर अक्षयची ही कॉमेंट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अवश्य पाहा - लग्न केल्यामुळं संपलं career; बेरोजगार actress शोधतेय काम

राम सेतू या चित्रपटात अक्षय एका इतिहास तज्ज्ञाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक शर्मानं स्विकारली आहे. या चित्रपटात अक्षयसोबत नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाबद्दल व्यक्त होताना अक्षय म्हणाला, “राम सेतु’च्या कथेनं मला नेहमीच अचंबित केलंय, प्रेरणा दिली आहे. राम सेतू हा भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील पिढ्यांमधील दुवा आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या