JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: राखीसाठी सलमान बनला देवदूत; असा वाचवला जवळच्या व्यक्तीचा जीव

VIDEO: राखीसाठी सलमान बनला देवदूत; असा वाचवला जवळच्या व्यक्तीचा जीव

राखी कुठल्याही वादग्रस्त व्हिडीओमुळं नव्हे तर आपल्या आईमुळं चर्चेत आहे. तिच्या कर्करोगग्रस्त आईची शस्त्रक्रिया झाली. अन् या उपचाराठी तिनं बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे आभार मानले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 फेब्रुवारी : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा तिला यामुळे ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी राखी कुठल्याही वादग्रस्त व्हिडीओमुळं नव्हे तर आपल्या आईमुळं चर्चेत आहे. तिच्या कर्करोगग्रस्त आईची शस्त्रक्रिया झाली. अन् या उपचाराठी तिनं बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे आभार मानले आहेत. राखीची आई जया या गेली अनेक वर्ष कर्करोगामुळं त्रस्त आहेत. आर्थिक अडचणींमुळे त्यांचा योग्य प्रकारे उपचार होत नव्हता. परंतु अखेर सलमान राखीच्या मदतीला धावून आला. त्यानं आईच्या केमो थेरेपीसाठी लाखो रुपयांची मदत केली. या मदतीसाठी राखीनं सलमानचे आभार मानले आहेत. तिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन सलमानची प्रचंड स्तुती केली आहे. “सलमान भाई तू रॉकस्टार आहेस. तू आम्हाला खूप मदत केलीस. आम्ही कायम तुझे ऋणी राहू. माझ्या आईची केमो थेरेपी सुरु आहे. चारपैकी दोन थेरपी झाल्या आहेत. आई आता हळूहळू पहिल्यासारखी तंदुरुस्त होतेय.” अशा आशयाची वक्तव्य करत राखीनं सलमानचे आभार मानले.

संबंधित बातम्या

शर्मिला टागोर नातवापासून दूर; का नाही पाहिला करीनाच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा? कोण आहे राखी सावंत? राखीचं खरं नाव नीरु भेदा असं आहे. रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी तिने आपलं नाव बदललं. तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. आर्थिक टंचाईमुळे तिला पुरेसं शिक्षण घेता आलं नाही. लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची. लहानपणापासूनच राखीला नृत्याची खूप आवड होती. गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राखी भाग घेत असे. अन् तिथूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली. १९९७ साली ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने आयटम सॉन्गवर डान्स केला. किंबहूना तिच्या अनोख्या नृत्यशैलीमुळे बॉलिवूडची नवी आयटम गर्ल म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं. काम मिळत असलं तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते त्यामुळे अनेक श्रीमंत लोकांच्या लग्नात ती वेटरचं काम देखील करायची. टीना अंबानी यांच्या लग्नात तिला ५० रुपये टीप मिळाली होती हा अनुभव अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितला होता. कधीकाळी एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणाऱ्या राखीनं आपली जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या